शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

गांधीनगरातील भाजी मंडईचा प्रश्न मार्गी

By admin | Updated: July 18, 2014 00:27 IST

जागा ग्रामपंचायतीच्या नावे करण्याचा ठराव : ‘कारभारी’ सदस्याचा डाव फसला

शिवाजी कोळी - वसगडेगांधीनगर (ता. करवीर) येथील बहुचर्चित भाजी मंडईची गट नं. २७४१ ही जागा ग्रामपंचायतीच्या नावे व्हावी, असा ठराव झाल्यामुळे भाजी मंडईचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. परिणामी कोट्यवधी रुपयांची मोक्याची जागा गिळंकृत करण्याचा एका ‘कारभारी’ सदस्याचा डाव मात्र फसला आहे.गांधीनगर येथील शिरूर चौक परिसरात सुमारे चाळीस वर्षांपासून भाजी मंडई भरते. चिंचवाड, वळिवडे, गडमुडशिंगीसह उचगाव परिसरातील शेतकऱ्यांना ही भाजी मंडई आधार आहे. दीडशेवर व्यापारीही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवितात. येथे कापडाची मोठी बाजारपेठ असल्याने त्याचाही फायदा भाजी विक्रेत्यांना होतो.ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे मोक्याची जागा लाटण्यासाठी प्रयत्न झाला. मंडईत गटर्स, लाईटची सोय नाही, दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाल्याने अगदी अडगळीच्या जागेत व्यापार करावा लागत असल्याच्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत. अशातच सन १९९७ पासून गट नं. २७४१ ही जागा एका खासगी मालकाच्या नावे झाल्याची माहिती उघडकीला आल्याचे भाजीपाला व्यापारी मंडळाचे सचिव अमोल एकल यांनी दिली.गांधीनगर संविधानिक विकास आराखड्यानुसार (सन १९८०) नगर भूमापन क्रमांक २७४३ क्षेत्र २२५-७ चौ. मीटर ही जागा भाजी मंडईसाठी आरक्षित असताना खासगी मालकांची नावे प्रॉपर्टी कार्डला लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. व्यापाऱ्यांच्यावतीने अमोल एकल यांनी लढा देत अखेर भाजी मंडईची जागा ग्रामपंचायतीच्या नावे करण्याचा ठराव मंजूर करण्यास भाग पाडले. ग्रामपंचायतीकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना तसा अहवालही पाठविल्याचे एकल यांनी सांगितले.