शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

कागलच्या युतीबाबत प्रश्नचिन्हच

By admin | Updated: January 13, 2017 01:06 IST

तिन्ही गटांत संभ्रम : नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चाही नाही, फक्त कार्यकर्त्यांमध्येच चर्चा

कोल्हापूर : माजी आमदार संजय घाटगे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक व भाजपचे नेते समरजित घाटगे यांच्यातील संभाव्य युतीबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम असून तिन्ही गटांमध्ये संभ्रम आहे.कारण त्यासंदर्भात या तिन्ही नेत्यांची एकत्रित बैठक अथवा प्राथमिक बोलणीही झालेली नाहीत. फक्त कार्यकर्त्यांचा पातळीवरच तसा रेटा आहे आणि वृत्तपत्रांत तशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे आजच्या घडीला तरी ही युती वृत्तपत्रांतील बातम्यांपुरतीच आहे.नगरपालिकेच्या निवडणुकीतही संजय मंडलिक व समरजित घाटगे यांच्यातील युतीची अशीच हवा तयार झाली. एकमेकांच्या भेटीगाठीही झाल्या परंतु शेवटी काय घडले व त्याचा परिणाम काय झाला हे निकालावरून तालुक्याला समजलेच. हा अनुभव असताना परत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांसह संजय घाटगे अशी तिघांच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे; परंतु ज्यांनी युती करायची ‘त्या’ तिघांची मात्र अद्याप याबाबत एकदाही चर्चा झालेली नाही. समरजित घाटगे व मंडलिक यांची भेट होणार होती परंतु मंडलिक यांना ऐनवेळी काही तरी काम निघाल्याने ते त्यादिवशी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यातही चर्चा झालेली नाही. या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा जागा आहेत. गेल्या निवडणुकीत पाचही जागा काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्याने संजय मंडलिक अध्यक्ष होऊ शकले.मिळालेल्या माहितीनुसार संजय घाटगे यांना मुलासाठी जिल्हा परिषदेची एक जागा, पंचायत समितीच्या दोन जागा व तेथील सत्ता आपल्या गटाकडे आणि आमदारकीला समरजित घाटगे यांनी पाठिंब्याचा ‘शब्द’ द्यावा असे वाटते. मंडलिक यांनी प्रत्येकी दोन जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या जागांची मागणी केली आहे. आतापर्यंत पंचायत समिती कायमच संजय घाटगे गटाकडे राहिली आहे त्यामुळे तिची सत्ता आपल्या गटाकडे असावी, असे मंडलिक गटालाही वाटते. समरजित घाटगे यांच्या गटाकडून जागाबाबत अजूनही पत्ते खुले केलेले नाहीत. नगरपालिकेच्या निवडणुकीत हाता-तोंडाशी आलेला विजयाचा घास दुरावल्याने गटाची सरशी व्हावी एवढीच सध्या तरी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. सन्मानजनक तोडगा होऊन युती झाली तर युती करून अन्यथा स्वबळावर भाजपचे कमळ चिन्ह घेऊन निवडणुकीत उतरण्याची तयारी त्यांच्याकडून सुरू आहे. युतीची चर्चा सुरू ठेवत अखेरपर्यंत संभ्रम राहिला तर ऐनवेळी काय होऊ शकते याचा अनुभव नगरपालिकेला आल्याने हा गट तसा सावध आहे.दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची मात्र ‘एकला चलो रे’ची भूमिका आहे. तालुक्यात एकदा आपल्या गटाची ताकद तरी किती आहे कळू दे असे त्यांना वाटते. जिल्हा परिषदेत त्यांच्या पक्षाची सत्ता नाही व तालुक्यात एकही जिल्हा परिषदेचा सदस्य नाही. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत काही गमवायचे नाही. कागलची नगरपालिका त्यांना हवी होती त्यात ते यशस्वी झाले. विधानसभेला अजून बराच अवधी आहे. तोपर्यंत बरेच पाणी पुलाखालून वाहून जाणार आहे. त्यामुळे मुश्रीफ सध्या तरी दोन घाटगे व मंडलिक यांच्या संभाव्य युतीकडे लांबून लक्ष ठेवून आहेत.