शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्तीवरूनच तंटा

By admin | Updated: September 8, 2015 23:51 IST

वाठार ग्रामसभेतील प्रकार : अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या कारणावरून दोन गटांत जुंपली

नवे पारगाव : वाठार (ता. हातकणंगले) येथील ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या कारणावरून दोन गटांत चांगलीच जुंपली. तंटामुक्तीवरून झालेल्या तंट्यामुळे गावात दुपारपर्यंत तणावपूर्ण वातावरण होते. पेठवडगावच्या पोलिसांच्या बंदोबस्तामुळे हाणामारी टळली. वादावादीमुळेच उधळली गेलेली १५ आॅगस्टची तहकूब ग्रामसभा मंगळवारी आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच काशिनाथ भोपळे होते. तंटामुक्ती समिती बदलाचा विषय सभेच्या पटलावर आला तसा गोंधळाला प्रारंभ झाला. ग्रामसभा सुरू करण्यापूर्वी ज्यांची अहवालावर सही आहे, त्यांचे मतदान घेऊन तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडला जावा, अशी मागणी विरोधी गटाने केली. या गोंधळानंतर अहवाल सभाध्यक्ष सरपंचांच्या हवाली करून तालुका विस्तार अधिकारी सभेतून निघून गेले. उपस्थित दोन्ही बाजूंच्या जमावाचा अंदाज घेऊन सरपंच भोपळे यांनी अध्यक्षपदी गोरखनाथ शिंदे, तर उपाध्यक्षपदी सर्जेराव भोसले यांची निवड जाहीर केली. यावर विरोधी गटाने हरकत घेतली. यावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला. सरपंच काशिनाथ भोपळे प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, तंटामुक्ती समिती अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड ही शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे लोकशाही पद्धतीने केली आहे. संख्याबळाप्रमाणे तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी आलेल्या अर्जांचा विचार करूनच नावे जाहीर केली असून, ती नियमाप्रमाणेच केली आहे. सभेवेळी वडगाव पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने हाणामारीचा अनर्थ टळला. यावेळी उपसरपंच राजकुमार शिंदे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)विरोधी गटाचे नेते तक्रार करणारतंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठी ग्रामसेवक अथवा शासकीय अधिकारी उपस्थित नसताना सरपंचांनी मनमानी पद्धतीने अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी केल्या. त्याविरुद्ध हातकणंगले गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे विरोधी गटाचे नेते महेंद्र शिंदे यांनी सांगितले.