शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

वडगावातील खून प्रकरणातील सख्ख्या भावासह पुतण्यास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:39 AM

याप्रकरणी अशोक शंकर जाधव (वय ५३), त्यांचा मुलगा प्रवीण (२२, रा. कैकाडी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. काल झालेल्या ...

याप्रकरणी अशोक शंकर जाधव (वय ५३), त्यांचा मुलगा प्रवीण (२२, रा. कैकाडी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. काल झालेल्या मारहाणीत भीमराव जाधव यांचा मृत्यू झाला होता.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, कैकाडी गल्लीतील भीमराव व अशोक जाधव यांच्यात जुन्या कारणावरुन वाद आहे. भीमराव जाधव यांचा मुलगा रणजित शौचालयाची टाकी स्वच्छ करताना त्याचे पाणी अशोक जाधव यांच्या घराच्या भिंतीवर आले. या कारणावरून रविवारी सायंकाळी भीमराव शंकर जाधव व त्यांची पत्नी, मुलगा, सून यांना सख्खा भाऊ अशोक जाधव व त्यांचा मुलगा प्रवीण या दाेघांनी काठी, दगड, विटा यांनी मारहाण केली. या मारहाणीत भीमराव जाधव जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर पोलिसांनी शवविच्छेदनानंतर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. भीमराव यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या छातीला गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे पहाटे स्पष्ट झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. अशोक जाधव हे वडगाव नगरपालिका कर्मचारी आहेत. दरम्यान, मुलगी चेन्नईहून आल्यानंतर भीमराव जाधव यांच्यावर आज सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आहे. तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे करीत आहे.