शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

एकमेकांतील द्वेष बाजूला ठेवा

By admin | Updated: April 22, 2016 00:55 IST

पतंगराव कदम, प्रदेशाध्यक्षपदापेक्षा जिल्ह्याशी जवळचा संबंध; संजय पाटील यांचा प्रवेश

कोल्हापूर : जिल्ह्णात अनेक वर्षांपासून काँग्रेस बळकट आहे. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत एकमेकांबद्दलचे द्वेष, जळमट बाजूला ठेवून एकसंघ राहा, असे आवाहन माजी वनमंत्री आमदार पतंगराव कदम यांनी गुरुवारी केले. येथील पक्ष कार्यालयात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा अध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपमधून संजय पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. आमदार कदम म्हणाले, जिल्हाध्यक्षांबद्दल वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या मी वाचल्या आहेत. अध्यक्षपदाची फारशी चर्चा करू नका. त्यासंबंधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची काय भूमिका आहे, याला मी कवडीचीही किंमत देत नाही. माझा कोल्हापूर जिल्ह्णाशी जवळचा संबंध आहे. पी. एन. पाटील, सतेज पाटील यांनी हाक मारली की मी हजर राहतो. सत्ता नसल्यानंतर काय होते, हे आपल्यालाही कळाले आहे. त्यामुळे जिल्ह्णातील कार्यकर्त्यांनी आपआपसांतील गट-तट बाजूला ठेवून जोमाने पक्ष बळकटीकरणासाठी काम करूया. राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आणूया. त्यानंतर पक्षातील कोणाचे काय करायचे ते ठरवूया. आमदार पाटील म्हणाले, सध्याच्या शासनाविरोधात प्रचंड असंतोष आहे. शासन फसव्या योजनांचे गाजर दाखवत आहे. भ्रष्टाचारी कारभार वाढला आहे. त्यामुळे संजय यांना आता काँग्रेस पक्षात राहून शासनाच्या विरोधात काम करण्याची चांगली संधी आहे. संजय पाटील यांचे भाषण झाले.पन्नास आंदोलन कर...प्रवेश झाल्यानंतर कदम बोलण्यासाठी उठले. त्यावेळी संजय पाटील हे मला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मला कोणते तरी पद जाहीर करा, असे कदम यांना सांगितले. त्यावर कदम यांनी पन्नास आंदोलन कर मग पद देऊया, असा उपरोधिक टोला लगावता एकच हशा पिकला. संजय पाटलांना कानपिचक्या..‘ऊठसूठ आंदोलन करणारा संजय पाटील कोण,’ अशी मला विचारणा होईल. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून आदेश आल्यानंतर आंदोलने करावीत. पक्षाच्या ध्येय-धोरणांनुसारच संजयने काम करावे, अशा कानपिचक्या ‘पी. एन.’ यांनी दिल्या. आमचे सरकार असताना नेहमी आंदोलने करणारा संजय पक्षात असता तर आमची अडचण झाली असती, असा टोलाही त्यांनी लगावला.