शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

आयुर्वेदाचे प्रयोजन

By admin | Updated: January 7, 2017 01:08 IST

आयुर्वेदाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, त्याने काही मूलभूत सिद्धांत दिले आहेत. ते वापरून तुम्ही नवीन रोगांवरही उपचार करू शकता.

आजज चर्चेला सर्वजण हजर होते. आयुर्वेद शिकणारे अनेक विद्यार्थी शंका समाधानासाठी येत. आजपासून त्यांनी एकत्रितपणेच चर्चेला बसायचे ठरविले.सर्वजण आलेले पाहून बिपिनने प्रश्न केला की, ‘सर, आज जगात सर्वत्र आयुर्वेदाचे वारे वाहू लागले आहेत; पण आज इतकी वर्षे ‘आयुर्वेद’ भारतातच का राहिला? त्याचा प्रसार का झाला नाही? आयुर्वेदाचे मूळ तत्त्व काय?जशी ज्ञानेश्वरी लिहिताना ज्ञानेश्वरांनी स्वत:ची परंपरा साक्षात शंकराकडून सुरू होते, असे सांगितले. तसेच आयुर्वेदाची परंपरा ही ब्रह्मदेवापासून सुरू होते. तिथून पुढे प्रज्ञापती-अश्विनीकुमार-इंद्र अशी ती आली आहे. सुरुवातीला या पृथ्वीवर फारशी रोगराई नसावी. त्यामुळे लोकांना औषधांची गरज पडली नाही. पुढे इथे रोगराई सुरू झाल्यावर ऋषींना ते बरे करण्याची आवश्यकता भासू लागली. म्हणून त्यांनी पुनर्वसू आत्रेयांना आपला नेता बनवून हे ज्ञान प्राप्त केले. (यावरून त्याकाळी ज्ञानार्जनासाठी देश सोडून जाण्याची पद्धत असावी.) पुढे अग्निवेश, आदी ऋषींनी आत्रेयांपासून ज्ञान प्राप्त करून आपापले ग्रंथ लिहिले. आज काळाच्या ओघात परकीय आक्रमणांनी त्यातील अनेक ग्रंथ नष्ट झाले.प्रत्येक गोष्टीला पुढे जाण्यासाठी दोन गोष्टींची जरुरी असते. एक लोकाश्रय दुसरा राजाश्रय. हे पुरेसे मिळाले तरच एखादी कला, शास्त्र पुढे जाऊ शकते. परकियांच्या राजवटीत हे अशक्य असते.आयुर्वेद हा इतर शास्त्रांपेक्षा फार वेगळा आहे. त्यांचे वैशिष्ट्य जर कशात असेल, तर ते रोगांचा विचार करण्यात. रोग झाल्यावर बरे करण्यासाठी अनेक औषधोपचार पद्धती आहेत; पण कसे वागल्यावर रोग होणारच नाहीत किंवा झाले तरी त्याचे परिणाम तीव्र होणार नाहीत, असे सांगणारे ‘आयुर्वेद’ हे बहुधा जगातील पहिले आणि एकमेव शास्त्र आहे. वाहतुकीचे जसे नियम असतात आणि जर ते पाळले तर अपघात कमी होतात, तसेच इथे आहे. आरोग्याचे काही नियम आहेत आणि ते पाळले तर आजारपणांची संख्या निश्चितच कमी होते.आता आपल्याला दिवसभर कसे वागायचे हे जसे माहीत पाहिजे. तसे ऋतुमान बदलत असताना काय करायला हवे, हे ही माहीत पाहिजे. सरळ रस्त्यावर असणारा गाडीचा वेग आपण वळण झाल्यावर कमी करतो. नाहीतर अपघात होईल, हे माहीत असते. तसेच ऋतुमानाप्रमाणे दिनचर्या बदलायला हवी, हे ही माहीत हवे. नाहीतर आजारपण ठरलेलेच !आजकाल अनेकांना प्रश्न पडतो की, आम्हाला काही होत नाही, मग आम्हाला औषध कशाला? आपले शरीर, मन इतके संवेदनशील नसते की प्रत्येक पुढे होणाऱ्या आजारांची कल्पना आपणास आधी येत नाही; परंतु एखादा आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य सर्वांगीण परीक्षा करून बऱ्याचवेळा पुढे होणाऱ्या आजारांची कल्पना रुग्णाला देऊ शकतो, अशाप्रकारे जे रुग्ण नाहीत, त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि जे आजारी पडलेत त्यांना चिकित्सा (औषधोपचार) देऊन बरे करणे, अशी दुहेरी भूमिका आयुर्वेद निभावत असतो.आयुर्वेदाच्या बाबतीत अनेकांना आणखी एक शंका येते ती म्हणजे, आजकाल दिसणारे रोग आयुर्वेदात कुठे वर्णन केले आहेत? आयुर्वेदाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, त्याने काही मूलभूत सिद्धांत दिले आहेत. ते वापरून तुम्ही नवीन रोगांवरही उपचार करू शकता. ते कसे, ते आपल्या पुढच्या चर्चेत कळेलच. उद्या पुन्हा नवीन शंका घेऊन मुले येतील. तोपर्यंत आजची चर्चा इथेच थांबवू.---- - डॉ. विवेक हळदवणेकर(डॉ. विवेक हळदवणेकर हे प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ आहेत)