शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पुनवेचा चांद- भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST

अवघडलेल्या स्थितीत रमाला रिक्षात घालून तिचा नवरा शांताराम हाॅस्पिटलच्या दिशेनं निघाला. खेड्यातून हाॅस्पिटलला पोहोचायला किती वेळ लागणार, याचा त्याला ...

अवघडलेल्या स्थितीत रमाला रिक्षात घालून तिचा नवरा शांताराम हाॅस्पिटलच्या दिशेनं निघाला. खेड्यातून हाॅस्पिटलला पोहोचायला किती वेळ लागणार, याचा त्याला अंदाज येत नव्हता. आडवळणी रस्ते, पुराचं पाणी, लाईट नाही, रमा वेदनेनं विव्हळतेय अशा कठीण परिस्थितीत मदतीला कोणीच नव्हतं. संध्याकाळ उलटून गेली होती. रस्त्यावर तुरळक माणसं गुडघाभर पाण्यातून वाट शोधत कुठंतरी निघालेली. बायांच्या कडेवर तान्ही पोरं. चार चाैघांनी म्हाताऱ्याला झोळीतून उलचून घेतलेलं. गावात पुराच्या पाण्यानं थैमान घातलेलं. घराघरांत गुडघाभर पाणी. संसार सारा पाण्यात. अशा अडचणीत शांताराम धायकुतीला आला होता. पुराच्या पाण्यात त्यानं रिक्षा घातली खरी लाटांच्या माऱ्यानं रिक्षाला वेग येईना. रमा ओरडत होती.

काय म्हणावं या पावसाला. पाऊस का वैरी... कुठं जायचं... कसं जायचं.. देवा दया कर रे बाबा.. तिला सुखरूप दवाखान्यात पोहोचू दे. नवीन जन्माला येणारं बाळ सुखरूप असू दे. देवा दया कर... शांताराम मनोमन देवाला आळवत होता.

एवढ्यात रमाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पाण्यातून चालणाऱ्या येसू मावशी चटकन रिक्षात बसल्या. ‘‘बाय.. देव परीक्षा घेतुया.. घाबरू नगो... व्हईल सारं नीट.. धीर धर .. दमानं घे... मी हाय तुझ्यासंगट .. ’’

येसूमावशी सुतारपाड्यावर राहणाऱ्या. एकटीच विधवा बाई. कुणाच्याही अडीनडीला धावून जाणारी. ती निघाली होती पुढच्या वळणावर आपल्या बहिणीकडं. देवानंच तिला पाठवली जणू आता. शांतारामला थोडा धीर आला. म्हणाला,

‘‘मावशे, बेस झालं बग. तू देवावानी भेटलीस. अगं हिच्या कळा बघून मला काय सुदरना. त्यातून हा पाऊस. मावश्ये रमाची सुटका व्हईल ना गं.’’

तू गुमान रिक्षा चालव. म्या बघते हिच्याकडं. रमाच्या अंगावरनं हात फिरवत येसूमावशी म्हणाली. जिवाच्या आकांतानं तो रिक्षा चालवत होता. दवाखाना हाकेच्या अंतरावर आला आणि जोरात किंचाळत रमानं रिक्षातच बाळाला जन्म दिला. येसूमावशीनं जवळच्या पिशवीतून जुनेरं बाहेर काढलं. बाळंतीणीला मोकळं केलं. अडकित्त्यानं नाळ कापून जुनेराच्या फडक्यात बाळ स्वच्छ करून दुसऱ्या कापडात त्याला गुंडाळलं. बाळंतीणीला थोडं दुष्टन काढलं. रिक्षा दवाखान्याच्या दारात गेली. तिथल्या नर्सने बाळ-बाळंतीणीला स्वच्छ करून योग्य औषधोपचार केले. येसू मावशी होती म्हणून सारं निभावलं. ती नसती तर शांताराम एकटा काय करू शकणार होता.

मावशे तुला भनीकडं जायचं असल न्हवं.. चल सोडून येतो.. भन तुझी वाट बघत असंल.. शांताराम म्हणाला.

‘‘शांतारामा, माज्या भनीकडं जान्यापरुस रमाकडं ध्यान देणं जरुरीचं हाय.. सकाळ होऊ दे .. पोरीला काय हवं, नगो बघते, मग म्या भनीकडं जाते....’ येसूमावशीच्या बोलण्यानं शांतारामचं मन भरून आलं. देव हाय आपल्याला दिसत न्हाई... पण हाय ...’’

मध्यान रात रमा गुंगीतच होती. नवजात पोरगी शांत झोपली होती. आपण कुठल्या परिस्थितीत जन्म घेतलाय त्या कोवळ्या जिवाला कुठं माहीत होतं... सरकारी दवाखान्याच्या आतल्या बाकड्यावर बसून शांतारामनं रात्र काढली. कधीतरी त्याचा डोळा लागला होता. मावशी त्याला हाक मारत होती. ‘‘शांताराम.. अरं उठ... सूर्य वर यायला लागलाय न्हवं... पाऊस बी थांबलाय.. रमा अन् तुझी लेक सुखरूप हायती. भाईर टपरीवरनं चहा घेऊन ये... मावशी म्हणाली’’

शांतारामनं दवाखान्याच्या बाथरूममध्ये तोंड धुतलं. चूळ भरली आणि तो चहा आणायला टपरीवर गेला. चहावाला गरम भजी तळत होता. शांतारामनं दोन भजी प्लेट घेतली आणि दोन चहा. मावशी संगट चहाभजी खाल्ल्यावर दोघांनाही थोडा हुरूप आला.

नर्स म्हणाली, दादा, बाळंतीणीला गाडीवरून गरम दूध-साखर घालून आणून द्या. बिस्कीटं मिळाली तर आणा. शांताराम पुन्हा बाहेर गेला. चहावाल्याकडं बरणीत बिस्कीटपुडे होते. शांतारामने दहा-दहा रुपयांचे मारी बास्किटाचे दोन पुडे आणि गरम दूध घेतलं.

रमा आता सावरली होती. लेकीला छातीशी धरून पाजण्याचा प्रयत्न करत होती. शांतारामनं अतिशय प्रेमळ नजरेनं आपल्या बायकोकडं पाहिलं. समाधानानं दोघं हसली. बिस्कीट-दूध घेतल्यावर रमाला हुशारी वाटली. मावशी नर्सबरोबर काही बोलत होती. शांताराम म्हणाला, ‘मावशे तुझं लई म्हणजे लईच उपकार झालंत बघ.. माझ्या बायकोला आणि बाळाला वाचवलंस. तुझं उपकार कसं फेडायचं आम्ही...!

अरं शांताराम ... याला माणुसकी म्हणत्यात. उपकार न्हवत. म्या नसते तर दुसरं कोणी तुझ्या मदतीला आलं असतं. जड वाटून घिऊ नकोस.. माणसानं माणसाला मदत करायला पायजेल न्हवं ... उपकार कशाचं रं बाबा.. तुझ्या लेकीच्या जन्माला माझा हातभार ही देवाचीच किरपा म्हणायची... चल, आता मला भनीकडं घेऊन. तीन दिस रमा आणि बाळ दवाखान्यात राहणार. आपण घरला जाऊ. गरजेच्या वस्तू घेऊन पुन्हा माघारी येऊ. तोवर नर्सबाई रमा आणि लेकीची काळजी घेत्याल... मावशीनं साधं सोपं तत्त्वज्ञान सांगितलं.

रमेचा निरोप घेऊन दोघं निघाली. पाऊस पूर्ण थांबला होता. रात्रीतून रस्त्यावरचं पाणी ओसरलं होतं. अर्ध्या तासात रिक्षा येसूमावशीच्या भनीच्या दारात. ती वाटच बघत होती. मावशीनं भनीला घडला प्रकार सांगितला. दोघींनी जेवण तयार केलं. डबा भरून घेतला. दोन जुन्या साड्या, बेडशीट, तांब्या-भांडं, ग्लास, चमचा, ताटली अशा गरजेच्या वस्तू घेऊन तासाभरात रिक्षा पुन्हा दवाखान्याच्या दारात आली. मावशीनं जुनी साडी फाडून धजेती तयार केली. नर्सनं अंघोळ घालून बाळाला दवाखान्याच्या दुपट्यात गुंडाळून ठेवलं होतं. झबलं, टोपडं घातलं होतं. पावडर लावली होती. रमाची लेक तरतरीत दिसत होती. रमाला मऊ गुरगुट्या भात, मेतकूट, इवलंस तूप घालून मावशीनं दिला. रमाच्या डोळ्यात पाणी तरळलं. मावशी निटपऱ्या रागानं म्हणाली... आता डोळ्यात पाणी कशापायी, समदं झ्याक झालंय. गुमानं भात खाऊन घे. लेकीला अंगावरचं दूध पायजे. डोळं पूस .. तुझं पयलंच लेकरू. चार दिस कसबी जात्याल. काळजी करून नगो ... मावशीच्या दटावण्यानं रमानं डोळे पुसले.