कोल्हापूर : अयोध्येतील राममंदिर जमीन घोटळ्यासंबधी आम आदमी पार्टीतर्फे शनिवारी दुपारी शिवाजी पेठ उभा मारुती चौकातील मारुती मंदिरासमोर आरती करून आंदोलन करण्यात आले.
अयोध्येत राममंदिर उभारणीचे काम रामजन्मभूमी न्यासाच्यावतीने सुरू आहे. मात्र, यातील काही सदस्यांनी राममंदिरासाठी लागणारी अतिरिक्त जमीन खरेदी करताना दोन कोटी रुपये किमतीची जमीन तब्बल १८ कोटी ५० लाखांना विकत घेऊन घोटाळा केला असल्याचा आरोप आपचे खासदर संजयसिंह यांनी केला आहे. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी आम आदमी पार्टीच्या कोल्हापूर शाखेतर्फे ‘हे अंजनीच्या सुता तुझ्या रामाच्या नावाने होतोया भ्रष्टाचार, त्याला तू काय करणार? त्याला तू काय करणार’ अशा स्वरूपाची आरती करून आंदोलन करण्यात आले.
यावेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप पाटील, उत्तम पाटील, संतोष घाटगे, अमरजा पाटील, पल्लवी पाटील, विशाल वठारे, राकेश गायकवाड, विजय भोसले, बाबूराव बाजारी, गिरीश पाटील, बसवराज हदीमनी, प्रथमेश सूर्यवंशी, अमित चव्हाण, महेश घोलपे, प्रकाश हर्णे, मंगेश मोहिते, संतोष चळवंडी, शैलैश पवार, भाग्यवंत डाफळे आदी उपस्थित होते.
फोटो : १९०५२०२१-कोल-आप आंदोलन
आेळी : आम आदमी पार्टीतर्फे शनिवारी दुपारी कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकातील मारुती मंदिरासमोर अयोध्या जमीन घोटाळ्यासंबधी आंदोलन करण्यात आले. (छाया : आदित्य वेल्हाळ)