शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘पुणे-कोल्हापूर-पुणे’ गणपती विशेष रेल्वे

By admin | Updated: September 12, 2015 23:51 IST

उद्यापासून सेवा सुरू : पहाटे पावणेपाचला पुण्याहून, तर दुपारी अडीचला कोल्हापुरातून सुटणार

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथून कोल्हापूरकडे येणाऱ्या व कोल्हापुरातून पुण्याकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, यंदा मध्य रेल्वेने ‘ पुणे-कोल्हापूर-पुणे’ या गणपती उत्सव विशेष रेल्वेगाडीची सोय केली असून, ती उद्या, सोमवारपासून सुरू होत आहे. या रेल्वे सेवाअंतर्गत कोल्हापुरातून ही रेल्वे दररोज दुपारी अडीच वाजता छत्रपती शाहू टर्मिनस येथून सुटणार आहे; तर पुण्याहून येणारी रेल्वे पुणे स्टेशन येथून पहाटे पावणेपाच वाजता सुटणार आहे. पुण्याहून सुटणारी ही पॅसेंजर रेल्वे नीरा, लोणंद, सातारा, कऱ्हाड, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली, मिरज, हातकणंगले, रुकडी असे थांबे घेत कोल्हापुरातील शाहू टर्मिनसवर दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचणार आहे; तर कोल्हापुरातून सुटणारी पॅसेंजर हेच थांबे घेत पुण्यास रात्री साडेदहा वाजता पोहोचणार आहे. या रेल्वेस १२ डबे असणार आहेत. याशिवाय पुणे पॅसेंजर व नियमित गाड्याही प्रवाशांच्या सोयीसाठी असणार आहेत. सध्या पुणे येथे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एस.टी. बसचा प्रवास सर्वसामान्यांना आता परवडेनासा झाला आहे. रेल्वेचे जनरल तिकीट ९० ते १०० रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे सध्या रेल्वेने कोल्हापूर-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून मध्य रेल्वेने ही विशेष गाडीची तरतूद केली आहे. ( प्रतिनिधी )