शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळलेल्या कुत्र्याचा गडहिंग्लजमध्ये धुमाकूळ

By admin | Updated: June 22, 2017 01:19 IST

दोन विद्यार्थ्यांसह पाचजणांना चावालोकमत न्यूज नेटवर्क

गडहिंग्लज : येथे सकाळी अकराच्या सुमारास गजबजलेल्या दसरा चौक परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह एकूण पाचजण जखमी झाले. विशेष म्हणजे त्यानंतर तो कुत्रा आर्श्चयकारकरीत्या गायब झाला असून, नगरपरिषदेच्या १२ कर्मचाऱ्यांनी शोध घेऊनही तो कुठेच आढळला नाही. सागर कल्लाप्पा पाटील (वय २०, रा. कवळीकट्टी), श्रावण मनोहर कांबळे (१७, रा. दुंडगे) या दोन महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच काशीबाई पांडुरंग पावले (६०, रा. बहिरेवाडी), गुरूलिंग महादेव जंगम (६५, रा. बहिरेवाडी) व शिवगोंडा कलगोंडा पाटील (६०, रा. भडगाव) अशी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. बसस्थानकासमोरील रिक्षा स्टॉप तसेच भडगाव रोडवर १० ते १५ मिनिटादरम्यान त्या कुत्र्याने सर्वांच्या पायाचा चावा घेतला. त्यानंतर नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी त्याला पकडण्यासाठी धावले; पण तो सापडला नाही. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ‘अ‍ॅण्टी रॅबीज व्हॅक्सीन’ ही प्राथमिक लसही रुग्णालयात उपलब्ध नव्हती. ती खासगीतून खरेदी करून उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, तो कुत्रा पिसाळलेला असल्याने त्यासाठी ‘इक्वी रॅब’ ही लस देणे गरजेचे असून, ती जिल्हा रुग्णालयातच उपलब्ध असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप आंबोळे यांनी स्पष्ट केले. पण, सर्वांनीच त्यासाठी कोल्हापूरला जाण्याऐवजी ती लस स्व:खर्चाने खासगी मेडीकलमधून खरेदी करून डॉक्टरांना पुरविल्याने सर्व रुग्णांवर येथील उपजिल्हा रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.