कोल्हापूर : ‘ॲण्टिडोट’ कोरोना, चीन आणि बरंच काही या स्मिता सागर देशपांडे यांनी लिहिलेल्या कादंबरीला अखिल भारतीय मराठा प्रकाशक संघाचा प्रौढ वाङ्मय गटातील प्रथम पुरस्कार जाहीर झाला. पुण्यातील सह्याद्री प्रकाशनने ही कादंबरी प्रकाशित केली असून लवकरच अमेरिकेतून या साहित्यकृतीचा इंग्रजी अनुवादही प्रकाशित होणार आहे.
कोरोनाची सुरुवात, आंतरराष्ट्रीय घडामोडी, चीनची भूमिका, राजकारण, परराष्ट्र धोरण, अर्थकारण अशा अनेक अंगांनी अभ्यासावरून देशपांडे यांनी ही कादंबरी सिद्ध केली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, अविनाश धर्माधिकारी यांच्यासह वाचकांनी या कादंबरीचे स्वागत केले. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा हा पुरस्कार जाहीर झाला असून जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने २५ एप्रिलला पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. डॉ. माशेलकर यांच्या ग्रंथाचा त्यांनी केलेल्या अनुवादाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार याआधी मिळाला आहे.
२६०३२०२१ कोल स्मिता देशपांडे