कोल्हापूर : सार्वजनिक कार्य, उत्सव साजरे करणाऱ्या संस्था, मंडळे, उत्सव समित्यांनी आता वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मादाय उपायुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागाचे धर्मादाय सहआयुक्त श्रीमती एन. एस. पवार यांनी दिली आहे.महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमाने वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मादाय उपायुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या कलमान्वये वर्गणी गोळा करण्याबाबत धर्मादाय उपआयुक्त, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, १०७९/ख, वसंत प्लाझा, तिसरा मजला, बागल चौक, कोल्हापूर यांना विहित नमुन्यात माहिती कळविणे बंधनकारक आहे. न कळविल्यास ट्रस्ट कायदा कलम ६७ अन्वये गुन्हा ठरणार आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.वर्गणी परवाना सुलभरीत्या मिळण्यासाठी तालुकानिहाय न्यायिक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तालुका व अधिकाऱ्याचे नाव व पदनाम पुढीलप्रमाणे - करवीर (कोल्हापूरसह), राधानगरी, हातकणंगले, चंदगड या तालुक्यांसाठी श्रीमती यु. एस. पाटील (सहायक धर्मादाय आयुक्त-१). शिरोळ, भुदरगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यांसाठी आर. जे. चव्हाण (सहायक धर्मादाय आयुक्त-२). पन्हाळा, कागल, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यांसाठी यु. बी. काळपगार (सहायक धर्मादाय आयुक्त-३).अर्जाचा नमुना धर्मादाय उपआयुक्त कार्यालयात दि. १९ आॅगस्टपासून विकत मिळू शकेल. तसेच या पूर्वीपासूनच कार्य, उत्सव करीत असल्यास अर्जासोबत अध्यक्ष व सचिव यांचे पॅनकार्ड, तसेच ओळखपत्राची झेरॉक्स प्रत, मागील वर्षाचे हिशेब आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या परवानगीची छायांकित प्रत, त्याच भागातील नगरसेवकाचे शिफारसपत्र जोडावे. अशा सूचनाही धर्मादाय सहआयुक्त श्रीमती एन. एस. पवार यांनी या पत्रकाद्वारे केलीे. (प्रतिनिधी)
सार्वजनिक मंडळांनी घ्यायची आता वर्गणीसाठीही परवानगी
By admin | Updated: July 28, 2015 00:31 IST