शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पीटीएमकडून साईनाथचा धुव्वा

By admin | Updated: February 6, 2015 00:41 IST

अवधूत घारगे स्मृतिचषक : दिलबहार (ब)चा प्रॅक्टिसला धक्का

कोल्हापूर : पाटाकाडील तालीम मंडळ ‘अ’ने साईनाथ स्पोर्टस्वर ७-१ अशा गोलफरकाने, तर दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’वर टायब्रेकरवर मात करीत अवधूत राजेंद्र घारगे स्मृतिचषक सीनिअर फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली.छत्रपती शाहू स्टेडियमवर गुरुवारी सामन्याचे उद्घाटन मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते कै. अवधूत घारगे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. याप्रसंगी करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमर जाधव, निवृत्त उपअधीक्षक जयवंत देशमुख, नौशाद बोबडे, माणिक मंडलिक, संयोजन समितीचे अध्यक्ष श्रीनिवास जाधव, राजेंद्र घारगे, उमेश सावंत, दीपक घारगे, श्रीकांत मोहिते, नेताजी डोंगरे, सुनील ठोंबरे, आदी उपस्थित होते. स्पर्धेचे निवेदन विजय साळोखे यांनी केले.पहिला सामना पीटीएम ‘अ’ विरुद्ध साईनाथ स्पोर्टस् यांच्यामध्ये झाला. १८ व्या मिनिटाला पीटीएम ‘अ’च्या उत्सव मरळकरने गोल करीत संघाचे खाते उघडले. पाठोपाठ २२ व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे-पाटीलने गोल नोंदवत सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. या आघाडीनंतर पीटीएम ‘अ’ने अधिकच आक्रमक पवित्रा घेतला. पाठोपाठ २९ व्या मिनिटाला धैर्यशील पवार व ३२ व्या मिनिटाला दीपक थोरातने गोल करीत मध्यंतरापर्यंत सामन्यात ४-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात पीटीएम ‘अ’कडून ५१ व्या मिनिटाला राहुल नलवडेने आणि ५४ व्या मिनिटाला निजाय पटेलने गोल करत सामन्यात ६-० अशी भक्कम आघाडी घेतली. ७० व्या मिनिटाला साईनाथ स्पोर्टस्च्या अनिकेत चौगुलेने गोल करीत आघाडी कमी केली. मात्र, पीटीएम ‘अ’च्या अजिंक्य नलवडेने ७२ व्या मिनिटाला गोल करीत सामन्यात ७-१ अशी भक्कम आघाडी घेतली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली. दुसरा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ यांच्यामध्ये झाला. २४ व्या मिनिटाला दिलबहार ‘ब’च्या शशांक माने याने गोल नोंदवत संघाचे खाते उघडले. पाठोपाठ २८ व्या मिनिटाला प्रॅक्टिस ‘अ’च्या राहुल पाटीलने उत्कृष्टरीत्या बायसिकल कीकवर गोल नोंदवत सामना १-१ असा बरोबरीत आणला. पाठोपाठ ३३ व्या मिनिटाला प्रॅक्टिस ‘अ’च्या सुमित घाटगेने गोल नोंदवत सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. जादा वेळेत दिलबहार ‘ब’च्या सुशील मानेने गोल नोंदवत मध्यांतरापर्यंत सामना २-२ असा बरोबरीत केला. उत्तरार्धात दिलबहार ‘ब’कडून आदित्य मानेने पेनल्टीवर गोल केला. पाठोपाठ ७९ व्या मिनिटाला प्रॅक्टिस ‘अ’कडून अभिनव साळोखेने गोल नोंदवत सामना ३-३ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. सामन्याचा निकाल लावण्यासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यामध्ये सामन्यात दिलबहार ‘ब’ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर ४-३ अशा गोलफरकाने विजय मिळविला.