शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रदूषण’कडून ‘एसटीपी’चा पंचनामा

By admin | Updated: February 6, 2015 01:03 IST

‘प्रजासत्ताक’च्या तक्रारीची दखल : अहवाल न्यायालयात सादर करणार, नमुने घेतले

कोल्हापूर : कसबा बावडा येथील महापालिकेच्या घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (एसटीपी) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी झाडाझडती घेतली. प्रक्रियापूर्वी व नंतरचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. एसटीपी कें द्राची क्षमता ७६ दक्षलक्ष लिटर असूनही काहीअंशीच केंद्र सुरू असल्याचा निष्कर्ष मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काढला. केंद्राबाबतचा सविस्तर अहवाल लवकरच उच्च न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती मंडळाचे क्षेत्र अधिकारी शंकर केंदुळे यांनी यावेळी दिली.मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला ३१ जानेवारीपर्यंत एसटीपी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे केली होती. त्यानुसार आजच्या तपासणीवेळी महापालिकेचे उपायुक्त विजय खोराटे, याचिकाकर्ते दिलीप देसाई, पर्यावरण तज्ज्ञ व समिती सदस्य उदय गायकवाड, पर्यावरण अभियंता एस. के. पाटील, उपजल अभियंता एस. बी. कुलकणी, ‘एसटीपी’ची उभारणी करणारे ‘विश्वा इन्फ्रा’चे अधिकारी उपस्थित होते.मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दूषित व प्रक्रिया केलेले पाणी चाचणीसाठी चिपळूण येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रयोगशाळेतील उपकरणे बंदच स्थितीत आहेत. क्लोरिनेशनचे काम अद्याप होत नाही. केंद्रातील २० चेंबर्सपैकी फक्त सहा चेंबर्सचे काम पूर्ण झाले आहे. पंप हाऊसचे कामही पूर्ण झालेले नाही. प्रक्रिया केलेले पाणी वाहून नेण्यासाठीची पाईप अद्याप अपूर्णच असल्याने परिसरातील शेतात सांडपाणी मिसळते, आदींची गंभीर दखल प्रदूषण मंडळाने घेतली आहे. पाणी परीक्षण अहवालानंतर मंडळातर्फे सविस्तर अहवाल न्यायालयात सादर केला जाईल, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.