शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : तुम्ही निवडलेले वैद्यकीय क्षेत्रातील आयुष्य साधे-सरळ नाही. हे क्षेत्र वेगाने बदलत आहे. नवसंशोधन, बदलणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : तुम्ही निवडलेले वैद्यकीय क्षेत्रातील आयुष्य साधे-सरळ नाही. हे क्षेत्र वेगाने बदलत आहे. नवसंशोधन, बदलणारे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक अँड डेटा ॲनॅलेसिस या सध्याच्या आव्हानांमुळे आरोग्यसेवेवरील खर्च वाढत आहे. ही आव्हाने पेलून सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा द्या, असे आवाहन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी बुधवारी येथे केले.

येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या (अभिमत विद्यापीठ) नवव्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हॉटेल सयाजीमधील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, तर कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.

बस्तवडे (ता. कागल) येथील एअर मार्शल (निवृत्त) अजित भोसले यांना सन्मानदर्शक डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस.सी.) पदवी, तर अभिनेता आर. माधवन यांना डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट्‌.) आणि हेरले (ता. हातकणंगले) येथील ८५ वर्षीय शाहीर, कवी कुंतिनाथ करके-पाटील यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट्‌.) पदवी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या समारंभात वैद्यकीय शिक्षणातील विविध शाखांमधील ३६१ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली.

जगाच्या तुलनेत आपल्या देशातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, सुविधेच्या मर्यादा असूनही कोरोना काळात देशात चांगली कामगिरी झाली. देशातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आव्हान नवपदवीधरांनी पेलावे. वैद्यकीय संशोधक, डॉक्टर, औषध निर्मिती करणाऱ्यांनी एकत्रित काम करून आरोग्यसेवा व्यापक करण्याची गरज असल्याचे माजी कुलगुरू डॉ. खोले यांनी सांगितले.