शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राणेंवर टीका करण्यापूर्वी स्वत:ची पात्रता सिद्ध करा

By admin | Updated: August 8, 2014 00:40 IST

सतीश सावंत : दीपक केसरकर यांना लगावला टोला

कणकवली : स्वत:च्या स्वार्थासाठी दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नारायण राणे यांच्यापेक्षा दहापटीने विकास करणार असल्याची वल्गना ते करीत आहेत. मात्र, राणेंवर विनाकारण टीका करण्यापूर्वी त्यांनी प्रथम आपली पात्रता सिद्ध करावी आणि त्यानंतरच टीका करावी, असा टोला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे. येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत, नगरसेवक अण्णा कोदे उपस्थित होते. सतीश सावंत म्हणाले, आपल्यासोबत १० हजार कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार अशा वल्गना दीपक केसरकर करीत होते. मात्र, उद्धव ठाकरे सावंतवाडी येणार असल्यामुळे मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी भागातील शिवसैनिकच या प्रवेशावेळी उपस्थित होते. त्यामुळे किती लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला हा खरे तर संशोधनाचा विषय आहे. राष्ट्रवादीत असताना त्यांच्या पक्षाचे अर्थमंत्री तसेच बांधकाममंत्री असूनही दीपक केसरकर आपल्या विधानसभा मतदारसंघाचा विकास करू शकले नाहीत. आंबोली घाटाचा प्रश्न अजूनही रेंगाळत पडलेला आहे. राष्ट्रवादीने मंत्रीपद न दिल्याच्या नैराश्यातून तसेच माजी आमदार शिवराम दळवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानेच केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शैलेश परब हे इच्छुक होते. त्यांची मुंबई येथे केसरकर यांनी भेट घेतली आहे. शिवसेना प्रवेशामागे केसरकर यांचा स्वार्थ नसेल तर शैलेश परब यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणणार का? हे जाहीर करावे. सतीश सावंत यांची आपल्यावर टीका करण्याची पात्रता नाही असे म्हणणाऱ्या केसरकर यांनी नारायण राणेंवर बोलण्याची आपली पात्रता आहे का? हे प्रथम सिद्ध करावे आणि त्यानंतरच राणेंवर टीका करावी. दहशतवादावर बोलण्याचा केसरकरांना काहीही अधिकार नाही. १९९२ मध्ये आर. बी. दळवी यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करताना दोडामार्गसह इतर भागातील चार महिला जिल्हा परिषद सदस्यांना किडनॅप करण्यात आले होते. या प्रकरणाचे सूत्रधार केसरकर हेच होते. तेरा वर्षांपूर्वी सावंतवाडीत एका डॉक्टरचा खून झाला होता. त्यावेळी केसरकर मूग गिळून गप्प का होते? याचे उत्तरही त्यांनी द्यावे. उमेश कोरगांवकर यांना झालेल्या मारहाणीनंतर हे चांगले झाले असे म्हणणारे केसरकर हेच होते. त्यामुळे नारायण राणे यांचे नाव न घेता केसरकर यांनी राजकारण करून दाखवावे. (वार्ताहर)