शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

हिरुगडे यांना कार्यमुक्त करण्यास विरोध

By admin | Updated: February 4, 2015 23:58 IST

राजेश क्षीरसागर यांचाही पाठिंबा : सीपीआर बचाव समिती आंदोलन शिवसेना करणार

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील एकमेव सर्जन असलेल्या व राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. शिवकुमार हिरुगडे यांना कार्यमुक्त करण्यास सीपीआर बचाव कृती समिती व आमदार राजेश क्षीरसागर यांनीही कडाडून विरोध केला. चांगल्या डॉक्टरास घालवून जो विभाग चांगला सुरू आहे, त्याचेही वाटोळे करता काय, अशी विचारणा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांच्याकडे केली. डॉ. हिरुगडे यांची मंगळवारी तडकाफडकी पुण्याला बदली केली. डॉ. कोठुळे यांनी सायंकाळी त्यांना लगेच कार्यमुक्त केले. या जागेवर डॉ. कौस्तुभ मेंच यांना संधी देण्यासाठी महाविद्यालयाने ही तत्परता दाखवली. कागलच्या राजकीय नेत्यांचा त्यासाठी सीपीआर प्रशासनावर दबाव असल्याची चर्चा आहे. डॉ. कौस्तुभ मेंच हे जनरल सर्जन आहेत. राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या ‘असोसिएटेड प्रोफेसर’च्या परीक्षेतही ते अनुत्तीर्ण झाले आहेत व त्याच परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या हिरुगडे यांची बदली करून त्या जागेवर मेंच यांना संधी दिली जात आहे. ‘लोकमत’मध्ये बुधवारी (दि.४ फेब्रुवारी) त्या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यावर त्याची कृती समिती व आमदार क्षीरसागर यांनीही तातडीने दखल घेतली.समितीचे अध्यक्ष वसंत मुळीक यांनी डॉ. कोठुळे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते बाहेरगावी होते. त्यामुळे ते आल्यावर त्यांना शिष्टमंडळासह भेटण्याचा निर्णय झाला. सीपीआरमध्ये सध्या बालरुग्ण व प्रसूतीशास्त्र हे दोनच विभाग चांगल्यारितीने सुरू आहेत. त्यामध्ये तुम्ही हिरुगडे याच रुग्णालयात हवेत, असा आग्रह शासनाकडे धरायला हवा होता, असे त्यांनी बजावले. आमदार क्षीरसागर यांनीही ‘लोकमत’ची बातमी थेट वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पाठवली. हिरुगडे यांना राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयातच ‘असोसिएटेड प्रोफेसर’ या पदावर संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. हिरुगडे यांच्या बदलीचा प्रयत्न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करू, असा इशारा आमदारांनी कोठुळे यांना दिला.डॉ. हिरुगडे यांचा सीपीआर रुग्णालयास नक्कीच चांगला उपयोग होतो, परंतु सध्या ते सहायक प्राध्यापक (शल्यचिकित्सा) या ‘क्लास-२’ च्या पदावर आहेत. त्यांची पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक (क्लास-१) म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. कार्यमुक्त करण्याचे शासनाचेच आदेश आहेत. तिथे रूजू व्हायचे की नाही हे त्यांनीच ठरवायचे आहे. याप्रकरणी प्रशासनावर कोणताही राजकीय दबाव नाही.- डॉ. दशरथ कोठुळे, अधिष्ठाता, कोल्हापूर