शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
3
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
4
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
5
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
6
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
7
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
8
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
9
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
10
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
11
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
12
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
13
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
14
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
15
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
16
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
17
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
18
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
19
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
20
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड

राधानगरी तालुक्यात संरक्षण कठडे,रस्त्यांची दुरवस्था- दिशादर्शक फलकांचा अभाव,घाटांना वन्यजीव कायद्याचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:58 IST

राधानगरी : डोंगर दºयांनी व्यापलेल्या राधानगरी तालुक्यातील एकूण रस्त्यांपैकी ७५ टक्के रस्ते घाट मार्गाचे आहेत.

संजय पारकर ।राधानगरी : डोंगर दऱ्यांनी व्यापलेल्या राधानगरी तालुक्यातील एकूण रस्त्यांपैकी ७५ टक्के रस्ते घाट मार्गाचे आहेत. त्यामुळे येथे होणारी वाहतूक नेहमीच भीतीच्या छायेत असते. काही रस्त्यांचे अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी कठडे नाहीत. कोठेही दिशादर्शक फलक नाहीत. त्यातच रस्त्यांची नेहमीच असणारी दुरवस्था यामुळे वारंवार होणारे अपघातही चिंतेची बाब आहे.

राज्य मार्गाचा बराचसा भाग राधानगरी अभयारण्यातून त्याचा फटका रस्ते विकासाला बसतो. येथे अवघड वळणे व रस्त्याकडेने असणारी झाडे-झुडपे यांचा मोठा अडसर वाहतुकीला होतो.कोल्हापूरहून कोकण, गोव्याला जोडणारा राज्यमार्ग व निपाणी परिसरातील कर्नाटक राज्यातील भागाला कोकणाशी जोडणारा आंतरराज्य मार्ग हे दोन मार्ग गैबी तिट्ट्यापासून एकत्र जोडले आहेत. कोल्हापूरकडून येणाºया परिते-गैबी या २१ कि.मी.च्या रस्त्यात खिंडी व्हरवडे ते गैबी हा घाटमार्ग आहे. निपाणी-देवगड या राज्यमार्गावर सोळांकुरपासून घाट सुरू होतो. तो दाजीपूरपर्यंत, कोल्हापूर हद्दीपर्यंत ३८ कि.मी. व तेथून सिंधुदुर्ग हद्दीतील १२ कि.मी.चा फोंडाघाट असा ५० कि.मी. इतका प्रदीर्घ लांब आहे.

हा संपूर्ण भाग अभयारण्यातून जातो. येथे वन्यजीव कायद्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण करता येत नाही. त्याचा फटका येथील रस्ते विकासाच्या कामांना बसला आहे. रस्त्याला लागूनच मोठी झाडे, झुडपे आहेत. मोठमोठी अवघड वळणे असल्याने समोरून येणारे वाहन लवकर दिसत नाही. या टप्प्यात सतत लहान-मोठे अपघात होतात. मोठ्या दºया आहेत; मात्र बाजूच्या कठड्यांचा अभाव आहे.

बांधकाम विभागाने डिसेंबर २०१४ मध्ये केलेल्या वाहन गणतीत दाजीपूर येथे सप्ताहात ११०७३ मेट्रिक टन व मे २०१५ मध्ये १०३०० मेट्रिक टन भारमान झाले आहे. गैबीतिट्टा येथे डिसेंबर २०१४ मध्ये १४५३८ टन व मे २०१५ मध्ये १०११४ टन वाहतूक झाली आहे. आजमितीस विचार करता कोकणातून चिरे, वाळू व अन्य प्रकारची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

तालुक्यात मोठ्या वाहतुकीचे नऊ प्रमुख मार्ग आहेत. कोते-धामोड-शिरगाव-तारळे-पडळी-डीगस-दाजीपूर हा ४६ कि.मी.चा मार्ग जवळपास संपूर्ण घाटाचा आहे. म्हासुर्ली-राशिवडे हा १५ कि.मी. घाटमार्ग आहे. आकनूर-तारळे-दुर्गमानवाड-पडसाळी या रस्त्यावर १५ कि.मी.पेक्षा जास्त अवघड घाटमार्ग आहे. सोळांकुर-ऐनी-राजापूर-जळकेवाडी या मार्गात १५ कि.मी. घाटमार्ग व जंगल मार्ग आहे. हा मार्गही अभयारण्यातून जातो. परिणामी, तो अद्यापही बराच प्राथमिक स्थितीत आहे.बळींची वाढती संख्याजानेवारी २०१७ पासून या परिसरात जवळपास ३0 अपघात झाले आहेत. यात दोघांचा मृत्यू झाला. सातजण गंभीर व १३ जण किरकोळ जखमी झालेत.तालुक्यात गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या मार्गांवर सुमारे ८० अपघात झाले आहेत. यात १७ जणांना जीव गमवावा लागला आहे.त्याचप्रमाणे २७ गंभीर व २५ जण किरकोळ जखमी झाले आहेत.