शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

‘मसाज’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 01:02 IST

शनिवार पेठेत छापा : तिघांना अटक; सावंतवाडीतील दोन पीडित तरुणींची सुटका

कोल्हापूर : शहराच्या मध्यवस्तीत शनिवार पेठ पोस्ट कार्यालय परिसरातील इमारतीमध्ये ‘मसाज’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या हिना आयुर्वेदिक मसाज पार्लरवर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी छापा टाकला. या पार्लरच्या महिला मालकीणसह दोघांना अटक केली. शीतल दिग्विजय घाटगे (वय ३०, रा. महालक्ष्मी कॉलनी, गोळीबार मैदान, कसबा बावडा), गिऱ्हाईक दयानंद महादेव कुंभार (३६, रा. कौलगे, ता. गडहिंग्लज), दिनेश अशोक पोवार (२८, रा. राजारामपुरी ५ वी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. यावेळी सावंतवाडी येथील पीडित दोन तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली. पार्लरची दुसरी मालकीण आफ्रिन ऊर्फ हिना सय्यद (रा. इचलकरंजी) असून ती आजारी असल्याने सायंकाळी पाचच्या सुमारास इचलकरंजीला निघून गेली. त्यानंतर छापा पडल्याने ती मिळून आली. तिला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. पोलिसांनी सांगितले, शनिवार पोस्ट कार्यालय परिसरातील एका जुन्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर हिना आयुर्वेदिक मसाज पार्लर आहे. हे पार्लर आफ्रिन ऊर्फ हिना सय्यद व शीतल घाटगे या दोघी भागीदारीमध्ये चालवितात. सावंतवाडीतील तीन तरुणी कामाला आहेत. या पार्लरमध्ये जायचे असेल तर बोळातील अंधारातून चाचपडत जावे लागले. अडगळीच्या ठिकाणी असलेल्या पार्लरची कोणाला चाहूलही लागत नव्हती. याठिकाणी मसाजच्या नावाखाली राजरोज वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती खबऱ्याने शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी दिली. त्यानुसार त्यांनी बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पथकासह पार्लरवर छापा टाकला असता कुंटणखाना सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी शीतल घाटगे, गिऱ्हाईक दयानंद कुंभार, दिनेश पोवार यांच्यासह दोन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची कबुली दिली. पोलिसांनी स्वत: फिर्याद देऊन अनैतिक व्यापार प्रतिबंधक कलमानुसार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पीडित तरुणी या सावंतवाडी येथील असून त्यांची परिस्थिती गरिबीची आहे. यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दि. २४ आॅक्टोबरला दाभोळकर कॉर्नर परिसरातील मसाज सेंटरवर छापा टाकून अड्डा मालकीणीसह तिघांना अटक केली होती. शहरात शेकडोच्यावर मसाज सेंटर आहेत. त्यापैकी काही ठिकाणी राजरोस वेश्या व्यवसाय चालतो हे या कारवाईवरून निष्पन्न झाले आहे. (प्रतिनिधी) अशी केली कारवाई पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी एक बनावट गिऱ्हाईक खात्री करण्यासाठी पाठिवले. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ती व्यक्ती मजास पार्लरमध्ये गेली. त्याने स्पेशल मसाजची मागणी केली. अड्डा मालकीण शीतल घाटगे हिने त्याच्यासमोर २२ वर्षांच्या दोन तरुणी उभ्या केल्या. त्यातील त्याने एक पसंत केली. पार्लर तीन खोल्यांचे आहे. दोन खोल्यांमध्ये मसाज चालतो. आतील एका खोलीत गेल्यानंतर त्या व्यक्तीने मोबाईलवरून राणे यांना संदेश दिला. त्यानंतर काही वेळांतच छापा टाकला. महिला होमगार्डची मुलगी शीतल घाटगे हिला ताब्यात घेतल्यानंतर तिने पोलिसांना आपली आई गृहरक्षक दलात नोकरीस आहे. मी तिच्याकडेच राहतो असे सांगितले. शीतल ही यापूर्वी राजारामपुरीत मसाज पार्लर चालवत होती. पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद केल्याने तिने आपला मोर्चा मध्यवस्तीत वळविला. हिनाशी भागीदारी करून ती हा व्यवसाय चालविते. पार्लरकडे ग्राहकांचा ओढाशनिवार पोस्ट कार्यालय परिसरात शासकीय कार्यालये आहेत. याठिकाणी जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवहारासंबंधी नागरिकांची नेहमी वर्दळ असते. मध्यवस्तीत असलेल्या या मसाज पार्लरकडे अनेक ग्राहकांचा ओढा होता. प्रत्येकी दीड ते दोन हजार रुपये घेतले जात होते. संशयित हिना सय्यद, शीतल घाटगे यांच्या मोबाईल कॉल डिटेल्सवरून त्या कोणा-कोणाच्या संपर्कात आहेत, त्याचीही चौकशी करण्यात येणार आहे.