शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांसाठी २७५ कोटींवर प्रस्ताव

By admin | Updated: May 6, 2016 01:11 IST

महापालिकेत हालचाली : सल्लागार कंपनीशी चर्चा; महासभेत विषय आणणार

सांगली : महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांना जोडणारे उपनगरातील रस्त्यांच्या मजबुतीकरणाचा प्रस्ताव नगरोत्थान योजनेकडे पाठविण्याचा हालचाली गतिमान झाल्या आहेत. वर्षभरापूर्वी सल्लागार एजन्सीच्या शुल्कावरून वादळ उठल्याने हा प्रस्ताव बासनात गुंडाळला होता. आता पुन्हा एकदा पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी महासभेच्या पटलावर हा विषय चर्चेसाठी आणण्याची तयारी सुरू केली आहे. पूर्वीचा शंभर कोटीचा हा प्रस्ताव आता २७५ कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यताही आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विकास महाआघाडीच्या काळात शहरातील रस्त्यांचा मजबुतीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. शहरातील मुख्य रस्त्यांना जोडणारे उपनगरातील ४०, ६० व ८० फुटी रस्ते डांबरीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. भविष्यात उपनगरातील वाहतुक व वाहनांची संख्या गृहीत धरून प्रस्तावाचा विचार झाला होता. त्यासाठी मुंबईच्या सी. व्ही. कांड या सल्लागार एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. सल्लागार एजन्सीने प्रमुख रस्त्यांचा सर्व्हे केला. त्यात ४५ रस्त्यांचा समावेश करीत १०० कोटीचा प्रकल्प अहवाल महापालिकेला सादर केला होता. महापालिकेच्या महासभेत या प्रकल्पावर चर्चा झाली. सल्लागार एजन्सीला प्रकल्प रकमेच्या अडीच टक्के फी देण्याचा निर्णय झाला होता. त्यावरून वाद निर्माण झाला. त्यात ज्यांच्या प्रभागातील रस्त्यांचा प्रकल्पात समावेश नव्हता, त्या नगरसेवकांनी प्रभागातील सदस्यांचा आग्रह धरला. त्यानुसार आणखी दहा ते पंधरा रस्त्यांचा समावेश करून सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. अखेरीस महासभेने हा प्रस्ताव प्रलंबित ठेवला. विवेक कांबळे यांच्या महापौरपदाच्या काळात पुन्हा या प्रस्तावावर चर्चा झाली. पण सत्ताधारी काँग्रेसमधील मतभेदामुळे पुन्हा हा प्रस्ताव मागे पडला होता. काँग्रेसनेही सल्लागार फीचा मुद्दा उपस्थितीत केला होता. आता पुन्हा हा प्रस्ताव नव्याने महासभेसमोर येणार आहे. गुरुवारी महापौर हारूण शिकलगार, स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी सल्लागार एजन्सीच्या प्रतिनिधीशी चर्चा केली. सल्लागार फीचा वाद बाजूला ठेवून नव्याने प्रस्ताव तयार करण्याची सूचना त्यांनी केली आहे. त्यानुसार काही नवीन रस्त्यांचाही प्रकल्पात समावेश केला जाणार आहे. त्यामुळे शंभर कोटीचा हा प्रकल्प २७५ कोटीपर्यंत जाण्याची शक्यताही आहे. येत्या महासभेत हा विषय अजेंड्यावर घेऊन त्यावर चर्चा घडविण्याची तयारी सत्ताधारी काँग्रेसने चालविली आहे. (प्रतिनिधी) शासन मान्यतेनंतर फीसल्लागार कंपनीला प्रकल्प रकमेच्या अडीच टक्के फी देण्यात येणार आहे. महाआघाडीच्या काळात प्रकल्प अहवाल तयार केल्यानंतर एक टक्का व शासनमंजुरीनंतर उर्वरित दीड टक्का फी देण्याचा प्रस्ताव होता. पण महापौर हारूण शिकलगार यांनी जुना प्रस्ताव फेटाळत संपूर्ण प्रकल्प मंजूर करून शासन निधी प्राप्त झाल्यानंतर सल्लागार फी देण्याचा नवा प्रस्ताव दिला आहे. आता सल्लागार कंपनीला कोणतीही फी अदा केली जाणार नाही. एजन्सीने नगरोत्थान योजनेतून प्रकल्प मंजूर करून आणावा. त्यांना खात्री असेल तर त्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सुनावले आहेत. सभापती संतोष पाटील यांनीही सल्लागार फीबाबत महापौरांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.