शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नऊ नंबरची शाळा ‘मराठा भवन’साठी देण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: June 10, 2015 00:27 IST

महापालिकेतील बैठकीत मंजुरी : लवकरच स्थायी, महासभेची घेणार मंजुरी

कोल्हापूर : शिवाजी महाराज व राजर्षी शाहूंच्या विचारांचे प्रतीक असलेल्या, बहुजनांचे व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मराठा भवन’साठी महापालिकेने जागा द्यावी, अशी मागणी विविध मराठा संघटनांनी मंगळवारी महापालिका बैठकीत केली. राजारामपुरीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळा क्रमांक नऊचे मैदान ‘मराठा भवन’साठी योग्य असल्याचे मत स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी मांडले. याला सर्वच सदस्यांनी संमती दर्शविली. लवकरच या जागेला भेट देऊन स्थायी समिती व महासभेची मंजुरी घेण्याचे ठरले.मराठा भवनसाठी शहरातील महापालिकेची जागा निश्चितीबाबत चर्चा करण्यासाठी स्थायी समिती सभागृहात बैठक झाली. उपमहापौर मोहन गोंजारे अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिक्षण मंडळाचे सभापती संजय मोहिते, नगरसेवक परीक्षित पन्हाळकर, नगररचना सहसंचालक डी. एस. खोत, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आदींसह विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.सांगली, सातारा, रत्नागिरी, बंगलोर, आदी ठिकाणी मराठा भवन आहेत. बिहार राज्याने दिल्लीत केंद्रीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रशिक्षणार्थ केलेल्या भवनच्या धर्तीवर या मराठा भवनाचे कार्य चालणार आहे. पुढील १०० वर्षांचा विचार करून मराठा भवन हे जागतिक माहिती केंद्र ठरेल. मराठा भवनला आर्थिक मदत देण्यासाठी इतर समाजही आघाडीवर आहेत. कोल्हापुरातील मराठा भवन ‘बहुजन समाजाचे व्यासपीठ’ म्हणून ओळख निर्माण करील, असे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितले. दिलीप देसाई यांनी राजारामपुरीतील जनता बझारची जागा मराठा भवनला देण्याची मागणी केली. संगीता नलवडे यांनी किमान सहा एकर जागा हवी, असे स्पष्ट केले. हिंदुराव हुजरे-पाटील यांनी मराठा भवन निर्मिती व जागेच्या आडवे येणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. यावेळी महादेव पाटील, राजू सावंत, बाबा महाडिक, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, नीता सूर्यवंशी, संपत चव्हाण, प्रवीण पाटील, प्रशांत बरगे, प्रताप साळोखे यांनी आपली मते मांडले. (प्रतिनिधी)राजारामपुरीतील शाळेची जागा महापालिकेच्या मालकीची आहे. ही जागा मराठा भवनला देण्यास अडचण येणार नाही. यासाठी दोन दिवसांत प्रत्यक्ष जागेची पाहणी करून सर्वानुमते सभागृहात या जागेवर शिक्कामोर्तब करू. - आदिल फरास, सभापती, स्थायी समिती