शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

घोटवडे ग्रामपंचायत बरखास्तीचा प्रस्ताव

By admin | Updated: October 13, 2016 02:11 IST

दोन हजारांचा एलईडी बल्ब पाच हजारांना : पर्यावरण निधी नियमबाह्यपणे खर्च

समीर देशपांडे --कोल्हापूर --दोन हजार रुपयांचा एलईडी बल्ब तब्बल पाच हजार रुपयांना दाखवून पैसे हडप करणे, १५ टक्के मागासवर्गीयांसाठीचा निधी खर्च न करणे आणि पर्यावरण निधी नियमबाह्य पद्धतीने खर्च करणे या कारणांस्तव पन्हाळा तालुक्यातील घोटवडे ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने तयार केला आहे. याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविल्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवून त्यांना सुनावणी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार २७ सप्टेंबर आणि ३ आॅक्टोबरला सुनावणी घेण्यात आली असून, आता याबाबतचा अंतिम अहवाल पुन्हा विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. घोटवडे ग्रामपंचायतीने जून २०१५ मध्ये वीज बिल कमी होण्यासाठी गावामध्ये एलईडी बल्ब बसविले. हे काम निवास पाटील यांनी आपल्या भक्ती स्ट्रीट लाईट एनर्जी एजन्सी, जेऊर या संस्थेतर्फे घेतले होते; परंतु हे बल्ब निकृष्ट असल्याची तक्रार ग्रामस्थ विजय दिवाण यांनी केली होती. त्यांनी एक दिवसाचे उपोषणही केले होते. या प्रकरणी आमदार हसन मुश्रीफ यांनी विधानसभेतही प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन ग्रामसेवकांची वेतनवाढही रोखण्यात आली. याबाबत चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या प्रकल्प कार्यकारी अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी १९ सप्टेंबर रोजी गावामध्ये जाऊन तपासणी केली असता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. हा चौकशी अहवाल ग्रामपंचायत विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ही एलईडी दिव्यांची तक्रार आल्यानंतर आणि विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने आणखी खोलात जाऊन या ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी केली असता मागासवर्गीयांचा निधी खर्च न करणे तसेच पर्यावरण निधी नियमबाह्ण पद्धतीने खर्च केल्याची बाब उघडकीस आली. या सर्व बेकायदेशीर कारभाराची दखल घेत ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याबाबत संबंधित सरपंच आणि सदस्यांचेही म्हणणे नोंदवून घेण्यात आले आहे. एकूणच या प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने खंबीर भूमिका घेतल्याचे दिसत आहे.दोन ग्रामसेवकांची चौकशी सुरूएकूणच, घोटवडे ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी केल्यानंतर ज्या तीन ग्रामसेवकांच्या कालावधीत हा गैरकारभार झाला आहे, त्यांतील एकाची वेतनवाढ रोखण्यात आली असून, दोन ग्रामसेवकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.चौकशी अहवालातील मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाची आवश्यक तांत्रिक मंजुरी घेतली नाही.स्लॅँग कंपनीचा एक बल्ब २०१८ रुपयांना असून त्याची किंमत पाच हजार लावण्यात आली आहे. हे बल्ब चायना मेड असून ते टिकाऊ नाहीत.हायपॉवर बल्ब बसविणे बंधनकारक असताना कमी क्षमतेचे बल्ब बसविले आहेत.टेंडरमध्ये जोडलेली कोटेशन्स एकाच माणसाने वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावावर भरली असून, उर्वरित कंपन्यांनी आपण टेंडर भरले नसून, आपल्या लेटरपॅडचा गैरवापर केल्याचे पत्र दिले आहे.४टेंडरमध्ये स्लॅँगचे बल्ब लिहिले असताना ३० पैकी पाच ठिकाणी दुसऱ्या कंपनीचे बल्ब बसविले असून, त्यांतील तीन बल्ब तपासणीवेळी बंद होते.