शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘खेलो इंडिया’अंतर्गत साडेपाच कोटींचा प्रस्ताव

By admin | Updated: September 20, 2016 01:14 IST

महापालिका महासभेत मंजुरीची प्रतीक्षा : ध्यानचंद हॉकी स्टेडियमचा कायापालट होणार

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया-स्पोर्टस् इन्फ्रा स्ट्रक्चर’ योजनेंर्तगत पायाभूत क्रीडा सुविधा निर्मितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने साडेपाच कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला महासभेची मंजुरी घेऊन क्रीडा कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. त्यात ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये अ‍ॅस्ट्रो टर्फसह अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.केंद्र सरकारच्या या योजनेत सिंथेटिक हॉकी मैदानाकरिता साडेपाच कोटींचे अनुदान महापालिकेला मिळणार आहे. याकरीता महापालिकेने ६ कोटी ४० लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. यासह ध्यानचंद हॉकी स्टेडियमचा कायापालट करण्यासाठी एकूण ११ कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिका प्रकल्प विभागाने तयार केला आहे. केंद्राचे साडेपाच कोटींहून अधिक होणारी उर्वरित रक्कम महापालिका उभी करणार आहे.हा प्रस्ताव ३१ आॅक्टोबर २०१६ या मुदतीत सादर होणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या महासभेपुढे या प्रस्तावाला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेला प्रस्तावाबरोबर अंदाजपत्रक व आराखडा, जागेबाबतची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. मिळणाऱ्या अनुदानाशिवाय महापालिकेला जादाचा खर्च स्वत: करून प्रकल्प पूर्ण करण्याबाबतचे हमीपत्रही सोबत जोडावे लागणार आहे. प्रस्तावाला प्रथम आयुक्तांची मंजुरी आवश्यक आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर तो महासभेपुढे ठेवावा लागणार आहे तेथून क्रीडा कार्यालयाक डे जमा करावा लागणार आहे. त्यानंतर या प्रस्तावाचा प्रवास भारतीय खेल प्राधिकरणाकडे होणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालय स्तरावर छाननी होणार. त्यातून साडेपाच कोटींना मंजुरी मिळणार आहे.त्यामुळे हा प्रस्ताव तत्काळ महापालिकेला परिपूर्ण करून पाठवावा लागणार आहे. अन्यथा मुदत निघून गेल्यानंतर पुन्हा पुढील वर्षाची वाट या स्टेडियमच्या कायापालटासाठी पाहावी लागणार आहे. ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये सिंथेटिक अ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदान होणे गरजेचे आहे. खेळाडूंना ही सुविधा मिळाल्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचे हॉकीपटू चमक दाखविणार नाहीत. त्यात केंद्र सरकारकडून ‘खेलो इंडिया’अंतर्गत अ‍ॅस्ट्रो टर्फ घेण्यासाठी आयती संधी आली आहे. त्याकरिता परिपूर्ण प्रस्ताव महापालिका प्रशासन, पदाधिकारी यांनी तत्काळ क्रीडा खात्याकडे पाठविण्याची गरज आहे. - विजय साळोखे, अध्यक्ष , कोल्हापूर जिल्हा हॉकी असोसिएशन