शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता नुकसानाचे दावे विमा कंपनीकडे येताहेत जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : यंदाच्या महापुरात वाहनांपेक्षा स्थावर मालमत्ता व त्यातील मालाचेच अधिक नुकसान झाले असून, अंदाजे ४०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : यंदाच्या महापुरात वाहनांपेक्षा स्थावर मालमत्ता व त्यातील मालाचेच अधिक नुकसान झाले असून, अंदाजे ४०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जाणकारांकडून व्यक्त होत आहे. विमा कंपन्यांकडे आलेल्या दाव्यांमध्ये वाहनांपेक्षा ७० टक्के प्रमाण हे मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या दाव्यांचे आहे.

दोन वर्षांपूर्वीही पूरक्षेत्रातील घरांसमोर उभी केलेली दुचाकी व चारचाकी वाहनांसह मालमत्ता बुडून अनेकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या महापुरात काय स्थिती होती, हे ‘लोकमत’ने जाणून घेतले. यंदा वाहनांपेक्षा अधिक नुकसान मालमत्तेचे झाले आहे. याबाबतचे दावे विमा कंपन्यांकडे पूर ओसरल्यानंतर येऊ लागले आहेत. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी व्यापारी, आस्थापना आणि वैयक्तिक प्रकारचे विमा अनेक नागरिक काढतात. विशेषत: व्यापाऱ्यांमध्ये इमारतींसह त्यातील मालाचाही विमा करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वादळ, वारा, पाऊस आणि पुरात नुकसान झाले तर त्याची नुकसानभरपाई संबंधित विमा कंपनी परताव्याच्या रूपाने विमाधारकाला देते. त्यामुळे जीवन विमासह आणि स्थावर मालमत्ता, व्यवसाय, वाहन आदींचा सर्वसाधारण विमा उतरविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फायदा पुरासारख्या परिस्थितीत विमाधारकांना मिळतो. त्यामुळे असा विमा अनेकांनी उतरवला आहे. त्यानुसार विविध विमा कंपन्यांकडे असे दावे दाखल होऊ लागले आहेत. मागील २०१९च्या पुरात ३,५००हून अधिक वाहनांचे नुकसान झाले होते. त्यांचे दावे विमा कंपन्यांकडे दाखल झाले होते. यंदा वाहनांपेक्षा मालमत्ता नुकसानाचे दावे सर्वाधिक दाखल झाले आहेत. त्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम कंपन्यांनी नेमून दिलेले सर्व्हेअर करत आहेत. त्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यात ४०० ते ५०० कोटी रुपयांचे सर्वच प्रकारचे नुकसान झाले आहे.

यंदा वाहनांची काळजी अधिक

शहरातील शाहूपुरी, नागाळा पार्क, लक्ष्मीपुरी, सिद्धार्थ नगर, बापट कॅम्प, कदमवाडी, आदी ठिकाणी नागरिकांनी पुराचा अंदाज घेऊन आपली वाहने सुरक्षित ठिकाणी लावली. त्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याचे प्रमाण कमी झाले.

दावा असा दाखल करता येणार

संबंधित मालमत्ता, वाहन आदीचे नुकसान झाले असेल तर त्या विमाधारकाला आपल्या पाॅलिसी कागदपत्रांसह प्रांताधिकारी, तहसीलदार यांचे ना हरकत प्रमाणपत्र व तलाठी, पोलीस पाटील यांची पंचनामा कागदपत्रे विमा कंपनीत सादर करावी लागणार आहेत. याशिवाय व्यवसाय प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज असेल तर त्यासंबंधीची कागदपत्रे, खरेदी पावत्या, कर पावत्याही सत्यप्रतीत सादर करणे गरजेचे आहे.

कोट

यंदाच्या पुरात वाहनांपेक्षा सर्वाधिक नुकसान मालमत्तेचे झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ४०० कोटींहून अधिक नुकसान पुरात झाले आहे.

- विजय रेळेकर, सर्व्हेअर

कोट

काही गावांमध्ये जिल्हा प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी पुरात घरांमध्ये थांबता येणार नाही, अशा नोटीसही बजावल्या होत्या. तरीसुद्धा अनेक नागरिक तेथेच होते. त्यामुळे अशा नागरिकांना विमा संरक्षणात दावा दाखल करून परतावा मिळणे कठीण आहे.

- शंकर जाधव, विमा अधिकारी, न्यू इंडिया ॲश्योरन्स कंपनी, कोल्हापूर