शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळा वसुली भांडवली मूल्यावर

By admin | Updated: March 28, 2016 00:07 IST

--ग्रामपंचायतींना दिलासा : घटनेतील समानतेच्या कायद्यानुसार निर्णय

अतुल आंबी --इचलकरंजी --भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा वसुली करण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमार्फत घरफाळा वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या निर्णयासाठी एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१५ पर्यंत वसुलीसाठी स्थगिती असल्याने वसुलीमध्ये थोडी दमछाक होताना दिसत आहे. मात्र, या निर्णयामुळे सर्वांना समानतेचा न्याय मिळाला असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.सन २००१ सालापूर्वी ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतींची घरफाळा वसुली भांडवली मूल्यावरच केली जात होती. मात्र, गावपातळीवरील गट-तट व राजकारण यामधून काही ठिकाणी अन्याय होत होता. त्यामुळे शासनाने २००१ पासून क्षेत्रफळावर आधारित घरफाळ्याची वसुली सुरू केली. यामध्ये घराच्या वर्गवारीनुसार ठरलेल्या दराला घराच्या क्षेत्रफळाने गुणाकार करून घरफाळा ठरविला जात होता. मात्र, जुनी घरे व नवीन घरे यासाठी क्षेत्रफळावर आधारित एकच दर लागू होऊ लागला. म्हणून डॉ. विजय शिंदे यांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यामध्ये घटनेच्या समानतेच्या कायद्याला या क्षेत्रफळानुसार वसुलीमुळे धक्का लागत असल्याचे नमूद केले.त्यावर वेळोवेळी सुनावणी होऊन डिसेंबर २०१५ मध्ये न्यायालयाने भांडवली मूल्यावरच घरफाळा वसुली करण्याचा निर्णय शासनाला दिला. त्यानुसार २०१५-२०१६ ची घरफाळा वसुली भांडवली मूल्यावर सुरू झाली आहे. यामध्ये गावातील रेडिरेकनरचा दर (किमान मूल्य) त्याला भारांक १ (एक हजारच्या भागाने) नुसार भागाकार करून त्याला घराच्या वर्गवारीनुसार ठरलेल्या दराप्रमाणे गुणाकार करून त्यानुसार घरफाळा लागू होणार आहे. म्हणजेच दहा लाख रुपये किमतीच्या आरसीसी घराचा घरफाळा सुमारे १२०० रुपयेपर्यंत होईल. शासनाच्या या निर्णयामुळे जुन्या इमारतींना कमी, तर नवीन इमारतींना जादा असा घरफाळा लागू होणार आहे.