शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

प्रचार तोफा आज थंडावणार

By admin | Updated: March 25, 2016 00:38 IST

रविवारी ९८ केंद्रांवर मतदान : चंद्रकांतदादा, मुश्रीफ, सतेज यांच्या आज सभा--गडहिंग्लज साखर कारखाना निवडणूक

गडहिंग्लज : हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता आज, शुक्रवारी होत आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा शुक्रवारी रात्री थंडावतील. रविवारी (दि. २७) सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत ९८ केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भू-संपादन) संजय पवार, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार हनुमंत पाटील, सहायक निबंधक ए. एच. भंडारी व धनंजय पाटील हे काम पाहत आहेत. आज, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता येथील लक्ष्मी चौकात मुश्रीफ-शिंदे-कुपेकर आघाडीची जाहीर सभा होत आहे. सभेत आ. मुश्रीफ व आ. सतेज पाटील मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. शहापूरकर व प्रकाश चव्हण यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या प्रचारार्थ म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या सभेत सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे दोन्ही सभांकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार सतेज पाटील आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष व माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे आणि संग्रामसिंह नलवडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास आघाडी आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर व विद्यमान उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, हत्तरकी गट आणि भाजप-सेना युतीचे काळभैरी शेतकरी पॅनेल व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पॅनेल यांच्यात तिरंगी सामना होत आहे. मंगळवारी (दि. २९) सकाळी ८ वाजता येथील गांधीनगरमधील पॅव्हेलियन हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)