शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाराशे तहसीलदारांची पदोन्नती थांबली

By admin | Updated: June 13, 2016 00:47 IST

जिल्ह्यातील २० तहसीलदार : २००५ पासून सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध न केल्याचा फटका

प्रवीण देसाई -- कोल्हापूर -राज्य शासनाने राज्यातील तहसीलदारांची ज्येष्ठता यादी २००५पासून प्रसिद्धच न केल्याने याचा फटका राज्यातील सुमारे १२०० हून अधिक तहसीलदारांना बसला आहे. यामध्ये जिल्ह्यातील २० तहसीलदारांचा समावेश आहे. यादी प्रसिद्ध न झाल्याने त्यांची पदोन्नती थांबली आहे.दरवर्षीच्या जानेवारी महिन्यात सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाते. यामध्ये कारकून, अव्वल कारकून व मंडल अधिकारी यांची सेवा ज्येष्ठता यादी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध केली जाते. तलाठ्यांची यादी, प्रांताधिकारी, नायब तहसीलदारांची, विभागीय आयुक्त व तहसीलदार-उपजिल्हाधिकाऱ्यांची यादी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडून प्रसिद्ध केली जाते. अशी सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याची रचना आहे. तहसीलदार वगळता उर्वरितांची यादी प्रत्येक वर्षी प्रसिद्ध केली जात आहे. असे असताना ही यादी गेल्या ११ वर्षांपासून का प्रसिद्ध केली नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पदोन्नतीसाठी ही सेवाज्येष्ठता यादी महत्त्वाची आहे; परंतु ती प्रसिद्धच न झाल्याने राज्यातील सुमारे १२०० हून अधिक तहसीलदारांना याचा फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील २० तहसीलदारांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे त्यांची पदोन्नती थांबली आहे. कारकून ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत वेळच्या वेळी यादी प्रसिद्ध झाल्याने त्यांचा पदोन्नतीचा मार्ग सुकर झाला आहे; तर तहसीलदार ही यादी केव्हा प्रसिद्ध होणार याकडे लक्ष ठेवून आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांच्या नेतृत्वाखालील सदस्यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे महसूल प्रधान सचिवांना निवेदन दिले आहे. ही यादी तत्काळ प्रसिद्ध झाली नाही तर १ जुलैपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.