शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार- धनंजय महाडिक यांचे स्पष्टीकरण

By admin | Updated: September 10, 2014 23:54 IST

‘कोल्हापूर’चे अस्तित्व लोकसभेत दाखविले

कोल्हापूर : महाडिक गटाचा असल्याचे सांगत काहीजण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. लोकशाहीत निवडणूक लढविणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. मात्र, मी ‘कोल्हापूर दक्षिण’सह सहाही मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांचाच प्रचार करणार आहे. आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज, बुधवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. खासदार म्हणून गेल्या शंभर दिवसांत संसदेत काय कामगिरी केली त्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. कोल्हापूरचे अस्तित्व संसदेत दाखवून दिल्याचा दावा त्यांनी केला. खासदार महाडिक म्हणाले, ‘विधानसभेसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी होईल, असे आतातरी वाटते. आघाडी झाल्यास माझ्या मतदारसंघातील आघाडीच्या सहा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढल्यास आमच्या पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी राहणार आहे. उचगावचे राजू माने हे महाडिक गटाचे असले तरी ते राष्ट्रवादीचे आहेत. निवडणूक लढविणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र, मी पक्षाच्या धोरणांविरोधात काहीही करणार नाही. खासदार म्हणून काम करताना गेल्या तीन महिन्यांत संसदेमध्ये ८ तारांकित आणि ५९ अतारांकित प्रश्न मांडले असून त्यावर चर्चा केली. राष्ट्रीय, राज्य आणि कोल्हापुरातील प्रश्नांचा त्यात समावेश होता. केंद्राच्या पातळीवरील कोल्हापूर, महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे. मांडलेल्या प्रश्नांवर सरकारकडून सकारात्मक ‘फिडबॅक’ मिळतो. मात्र, सरकारकडून फारसे चांगले निर्णय झालेले दिसत नाही. (प्रतिनिधी)विमानसेवेची प्रक्रिया अंतिम टप्प्यातकोल्हापुरातून विमानसेवा सुरू करण्याच्या सर्व ‘एनओसी’ मिळविल्या आहेत. विमानाची चाचणी झाल्यानंतर कोल्हापुरामधून सेवा सुरू होईल. उद्योगपती संजय घोडावत देखील विमान सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना आवश्यक एनओसी मिळवून देण्यासाठी मी मदत करणार आहे. काहीही करून कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगून महाडिक म्हणाले,‘पंचगंगा नदीची प्रदूषणमुक्ती, रंकाळा सुशोभीकरण, पासपोर्ट केंद्र, ट्रान्सपोर्टबाबतचा डॅमरेज चार्जेस, एफआरपीवर कराची आकारणी, सिमेंट दरवाढ अशा विविध प्रश्नांबाबत केंद्रातील १२ हून अधिक मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रश्न सोडवणुकीच्यादृष्टीने प्रयत्न झाले आहेत. ४६ कोटींच्या रस्त्यांना मंजुरीकेंद्र सरकारच्या ‘सीआरएफ’ आणि ‘पीएमजेसी’ योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी एकूण २८० कोटींची मागणी केली होती. त्यापैकी ४६ कोटींच्या रस्त्यांच्या मंजुरीचे पत्र मिळाले आहे. त्यामध्ये कळे-गगनबावडा, गारगोटी, आजरा, चंदगड, कासारी नदीचा पूल, आदींचा समावेश असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.महाडिक गट शिरोलीत...आगामी निवडणुकीत महाडिक गटाची भूमिका काय राहणार अशी विचारणा केल्यावर खासदार महाडिक यांनी ‘महाडिक गट नव्हे, राष्ट्रवादी,’ अशी दुरुस्ती केली. पक्षाच्या धोरणानुसारच आपली भूमिका असेल, असे स्पष्ट करत ‘महाडिक गट’ शिरोलीत असून, त्या गटाची भूमिका महाडिकसाहेबांनाच विचारा, असे त्यांनी हसत-हसत सांगितले.