शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कृषी महोत्सवांना चालना देणार

By admin | Updated: April 21, 2017 21:49 IST

सदाभाऊ खोत ; कऱ्हाडला प्रीतिसंगम आंबा महोत्सवास प्रारंभ

कऱ्हाड : ‘शेतीमालाला रास्त भाव मिळण्यासाठी व शेतीमाल विक्री प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषी महोत्सव आयोजित करण्याबरोबर अशा महोत्सवांना चालना देणार आहे,’ अशी ग्वाही कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. येथील शेती उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्र राज्य पणन मंडळ व शुअर शॉट इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रीतिसंगम महोत्सव या आंबा महोत्सव, गृहोपयोगी वस्तू व खाद्य जत्रेचे उद्घाटन शुक्रवारी सदाभाऊ खोत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. बाजार समितीचे उपसभापती आत्माराम जाधव, पणनचे विभागीय अधिकारी अनिल पवार, उपनिबंधक महेश चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी डी. ए. खरात, शुअर शॉट इव्हेंटचे व्यवस्थापकीय संचालक संदीप गिड्डे, बाजार समितीचे सचिव बी. डी. निंबाळकर, कोयना दूध संघाचे अध्यक्ष मारुती यादव, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, माजी अध्यक्ष हणमंतराव चव्हाण, महानंदचे संचालक वसंतराव जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, फत्तेसिंह जाधव, मन्सूर इनामदार, शिवाजीराव जाधव, सुनील बामणे यांची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री खोत म्हणाले, ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिकविलेला आंबा, कडधान्य, हळद, मसाले, भरडधान्य हे थेट ग्राहकांना विकता यावे यासाठी या पद्धतीचे महोत्सव प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणे गरजेचे आहे. पणन मंडळाच्या वतीने यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’यावेळी मंत्री खोत यांनी महोत्सवात आंब्याचा आस्वाद घेतला. बाजार समितीचे संचालक विजय कदम, अमृतराव पवार, मोहन माने, सचिन गुणवंत, मन्सूर फकीर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील-पोतलेकर यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादप्रदर्शन पाहण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच नागरिकांची पावले प्रदर्शन स्थळाकडे वळू लागली आहेत. महोत्सवात आंबा, गृहोपयोगी वस्तूंची मोठी रेलचेल असून, वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. रविवारी गजीनृत्य, सोमवारी डॉग-शो तर मंगळवारी आंबा खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.