शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

टाकवडे वेस येथील प्रकल्प : विरोध मोडून ‘एसटीपी’ जागेचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:05 IST

इचलकरंजी : टाकवडे वेस येथील भुयारी गटार सांडपाणी जलशुद्धिकरण प्रकल्पाची जागा (एसटीपी) ताब्यात घेण्यासाठी बुधवारी झालेला अल्प विरोध पोलिसांनी ...

इचलकरंजी : टाकवडे वेस येथील भुयारी गटार सांडपाणी जलशुद्धिकरण प्रकल्पाची जागा (एसटीपी) ताब्यात घेण्यासाठी बुधवारी झालेला अल्प विरोध पोलिसांनी मोडून काढला. नगरपालिकेने जागा ताब्यात घेऊन त्या भोवती तातडीने तारेचे कुंपण घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, संयुक्त गावभाग एसटीपीविरोधी कृती समितीने प्रकल्पाच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शने केली. सुमारे सहा तास चाललेले महिला-पुरुषांचे ठिय्या आंदोलन सायंकाळी स्थगित करण्यात आले.येथील वाढीव वसाहती व कबनूर-शहापूर परिसरासाठी नवीन भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. या योजनेअंतर्गत जमिनीखालून नळ टाकण्याचे काम ७१ टक्के पूर्ण झाले असून, ‘एसटीपी’ प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. मात्र, एसटीपीविरोधी कृती समितीने टाकवडे वेस येथे प्रकल्प नको, अशी भूमिका घेत जमिनीचा ताबा घेण्यास विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी नगरपालिकेने सुमारे ५00 पोलिसांचा फौजफाटा घेऊन जागेचा ताबा घेतला.बुधवारी सकाळी दहा वाजता जागेचा ताबा घेण्यास जाण्यापूर्वी पोलीस व नगरपालिका प्रशासन यांच्यावतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील जबाबदारी निश्चित करणारी बैठक घेतली. या बैठकीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी, अधिकारी व कर्मचारी यांना जबाबदारीची जाणीव करून देताना आंदोलनकर्त्यांना अपशब्द न वापरता त्यांचा विरोध निर्धारपूर्वक मोडून काढावयाचा असल्याचे सांगितले. तसेच बंदोबस्ताची आखणी केली.टाकवडे वेस येथील नियोजित प्रकल्पाच्या जागेवर दीपक कांबळे, राजा कांबळे, रवी रजपुते, अविनाश कांबळे, एम. के. कांबळे, राजू आरगे, प्रकाश कांबळे, आदींच्या नेतृत्वाखाली महिला-पुरुष आंदोलकांनी सकाळी दहा वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू केले होते. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी नगरपालिका व पोलीस यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी येताच आंदोलनकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. तेव्हा आंदोलनकर्त्यांच्यावतीने दीपक भोसले, राजा कांबळे, सयाजी चव्हाण, रवी रजपुते, आदींनी भूमिका मांडली, तर शासनाच्यावतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे व नगरपालिकेच्यावतीने मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी प्रशासनाची बाजू मांडली. मात्र, आंदोलनकर्त्यांनी आमचे विरोधाचे आंदोलन सुरूच ठेवू, असा निर्णय घेतला.मक्तेदार प्रकल्प उभारणार का?नागरिकांचा होणारा विरोध मोडून प्रकल्पाच्या जागेभोवती नगरपालिकेने तारेचे कुंपण उभारले. आता ही जागा भुयारी गटार योजनेच्या मक्तेदाराकडे प्रकल्प उभारणीसाठी देण्यात येईल. मात्र, गेले सव्वा वर्ष गटार योजनेचे कोणतेही काम न करणाºया या मक्तेदाराकडून प्रकल्प उभारण्यास कितपत सहकार्य मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.