शाळेतील मुलांची गरज ओळखून क्लबने यापूर्वी ॲक्वागार्ड व अन्य वस्तूही भेट दिल्या आहेत. यावेळी क्लबचे सचिव धनंजय थोरात, खजानीस राहुल गद्रे, सुनील कारंजकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : १९०६२०२१-कोल-रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज
‘आशा’च्या आंदोलनास अंगणवाडी कर्मचारी संघाचा पाठिंबा
कोल्हापूर : आशा कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मंगळवारपासून दोन दिवस कोरोना कामावर बहिष्कार टाकतील. असे पत्रकाद्वारे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने अध्यक्ष अतुल दिघे, सचिव सुवर्णा तळेकर व उपाध्यक्ष धोंडीबा कुंभार यांनी जाहीर केले आहे.
आशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा, सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कोरोना कामाचे पैसे ताबडतोब द्या, अंगणवाडी कृती समितीला वेतन व पेन्शनच्या मागण्यांसाठी चर्चेला बोलवा. अशी संघटनेने भूमिका घेतली असून मंगळवारी (दि.२२) व बुधवारी (दि.२३) या दोन दिवशी कोरोना कामावर बहिष्कार टाकण्याचे संघातर्फे आवाहन केले आहे. याबाबत उद्या, सोमवारी संघटनेचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. कोरोना कामावर दोन दिवस बहिष्कार असला तरी अंगणवाडी काम बंद ठेवले जाणार नाही, असेही संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.