शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात गौरी लंकेश हत्येचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 19:09 IST

कोल्हापूर : पत्रकार गौरी लंकेश अमर रहे, गौरी लंकेश यांच्या मारेकºयांचा निषेध असो, हत्येला जबाबदार सरकारचा निषेध असो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंदाबाद अशा घोषणा देत बुधवारी शहिद गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे बिंदू चौकात निषेध सभा घेण्यात आली. या खूनाचा डॉ. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या खूनाशी काही संबंध आहे का ...

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून आदराजंली; विविध घोषणांनी निषेध शहिद गोविंद पानसरे समता संघर्ष समितीचे बिंदू चौकात निषेध सभा डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

कोल्हापूर : पत्रकार गौरी लंकेश अमर रहे, गौरी लंकेश यांच्या मारेकºयांचा निषेध असो, हत्येला जबाबदार सरकारचा निषेध असो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंदाबाद अशा घोषणा देत बुधवारी शहिद गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे बिंदू चौकात निषेध सभा घेण्यात आली. या खूनाचा डॉ. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या खूनाशी काही संबंध आहे का याची कसून चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी हत्या करण्यात आली. याविरोधात बुधवारी संघर्ष समितीसह डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी बिंदू चौकात निदर्शने करत निषेध सभा घेतली. दरम्यान, शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी पत्रकार गौरी लंकेश यांना बुधवारी आदराजंली वाहिली. विविध घोषणा देत या विद्यार्थ्यांनी निषेध नोंदविला.

विद्यापीठातील बॅ. खर्डेकर ग्रंथालयासमोर विद्यार्थी-विद्यार्थीनीं जमल्या. याठिकाणी उमा पानसरे आणि गिरीश फोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदराजंली सभा झाली. यात उमा पानसरे म्हणाल्या, देशात धार्मिक आतंकवाद थैमान घालत असताना सरकार बघ्याची भूमिका घेवून एकप्रकारे खुन्यांचा बचाव करत आहे. सरकारने या खुन्यांवर कारवाई न केल्यास आमचा संयमाचा बांध सुटेल. गिरीश फोंडे म्हणाले, पुणे-कोल्हापूर-धारवाड-बेंगलोर असा भगवा आतंक भौगोलिकतेची निवड करुन पसरविला जात आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध हा ‘इंडिया अगेन्स्ट फॅसिझम’ या मोहिमे अंतर्गत करण्यात येत आहे.या सभेत सुनिता अमृतसागर यांनी पत्रकार गौरी लंकेश यांचा जीवनपट सांगितला. यानंतर ‘गौरी लंकेश अमर रहे’, ‘लडेंगे-जितेंगे’, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य झिंदाबाद’ अशा उपस्थितांनी घोषणा दिल्या. यावेळी प्रशांत आंबी, सलिल कलमे, धीरज कठारे, आरती रेडेकर, माधुरी राऊत, कृष्णा पानसे, अक्षय घोरपडे, प्रतिक कळंबटे, स्वप्निल पोवार, गणेश गडदे, अमोल रायकर, सिद्धी तांदळे, मुकुंद कदम, सुधाकर बागल, सुप्रिया सुतार, विक्रम मोरे, अश्विनी वाघमारे, स्वप्नाली निकम, सरदार जाधव, नितीन कांबळे, अक्षय कांबळे, प्रसाद पाटील, प्रविण लाड, सचिन बनसोडे, आदी उपस्थित होते.