शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:43 IST

कोल्हापूरच्या संचालकांना विश्वासात न घेता सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या चुकीच्या कारभारावरून सोमवारी सभासदांनी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व खजानिस संजय ठुबे यांचा निषेध केला. कोल्हापुरातील मुख्य कार्यालयासाठी जागा घेणे, कार्यवाह रणजित जाधव यांच्या राजीनाम्याला मंजुरी व सभासदांविषयी वापरण्यात आलेले ‘अपशब्द’ यावरून हा विषय तापला आहे.

ठळक मुद्देचित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध-कोल्हापूरच्या संचालकांना विश्वासात न घेता कामकाज

कोल्हापूर : कोल्हापूरच्या संचालकांना विश्वासात न घेता सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या चुकीच्या कारभारावरून सोमवारी सभासदांनी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व खजानिस संजय ठुबे यांचा निषेध केला. कोल्हापुरातील मुख्य कार्यालयासाठी जागा घेणे, कार्यवाह रणजित जाधव यांच्या राजीनाम्याला मंजुरी व सभासदांविषयी वापरण्यात आलेले ‘अपशब्द’ यावरून हा विषय तापला आहे.काही दिवसांपूर्वी पुण्यात चित्रपट महामंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, प्रमुख कार्यवाह रणजित जाधव, संचालक शरद चव्हाण, सतीश बिडकर चारही कोल्हापूरचे संचालक उपस्थित नसताना कार्यवाह रणजित जाधव यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.

यावेळी संचालकांविषयी अपशब्दही वापरण्यात आले. महामंडळाच्या कार्यालयासाठी कोल्हापुरातजागा खरेदीचा निर्णय झाला होता. मात्र, त्यापूर्वीच पुण्यातील जागा खरेदीवर चर्चा होऊन त्याला प्र्राधान्य दिले गेले. कोल्हापुरात हे महामंडळाचे मुख्य कार्यालय असल्याने येथील जागेचा निर्णय झाला पाहिजे, अशी येथील सभासदांची मागणी आहे.वरील विषयांवरून सोमवारी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात सभासदांची बैठक झाली.

महामंडळाच्या सभेत अध्यक्षांनी रणजित जाधव यांच्या राजीनाम्याचा प्रश्न संपल्याचे जाहीर केल्यानंतरही हा राजीनामा का मंजूर करण्यात आला, कोल्हापूर व मुंबई हे मुख्य केंद्र असताना पुण्यात जागा खरेदीचा अट्टाहास का, सर्वसाधारण सभेचे प्रोसेडिंग न दाखविता पुण्याला का पाठविले गेले, असे प्रश्न सभासदांनी उपस्थित केले तसेच अध्यक्षांच्या घटनाबाह्य कामकाजाचा व संचालकांविषयी ‘अपशब्द’ वापरल्याबद्दल संजय ठूबे यांचा निषेध करण्यात आला. यावेळी अध्यक्षांशी संपर्क साधला असता त्यांनी चार दिवसांत कोल्हापूरला आल्यानंतर चर्चा करू, असे सांगितले.यावेळी हेमसुवर्णा मिरजकर, महेश पन्हाळकर, इम्तियाज बारगीर, अभिनेता आनंद काळे, सर्जेराव पाटील, रवी गावडे, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, सतीश बिडकर, रणजित जाधव, सहखजानिस शरद चव्हाण, अवधूत जोशी, अमर मोरे, मनोज मराठे, अजय खाडे, परशुराम गवळी यांच्यासह सभासद उपस्थित होते. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर