शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘एव्हीएच’ प्रकल्प परिसरात आंदोलकांना प्रवेशास बंदी

By admin | Updated: March 23, 2015 00:43 IST

आंदोलकांना नोटिसा : न्यायालयात कंपनीचा मनाई दावा दाखल

चंदगड : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या ‘एव्हीएच’ विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या विरोधात ‘एव्हीएच’ कंपनीमार्फत चंदगड न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असून, या दाव्याच्या नोटिसा आंदोलनकर्त्यांना न्यायालयामार्फत बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे.‘एव्हीएच’विरोधात ७ मार्चला आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ व मोडतोड करून मोठे नुकसान केले. यापैकी १४ आंदोलकांविरोधात दावा दाखल झाला आहे. या आंदोलकांनी धरणे आंदोलन, रास्ता रोको अशा स्वरूपाची आंदोलने करू नयेत, तसेच या आंदोलकांना कंपनीच्या प्रवेशद्वारापासून २०० मीटर अंतरावर प्रवेश करण्यास मनाई मिळावी, असा दावा दाखल केला आहे.यासंदर्भात प्रा. एन. एस. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, आंदोलकांवर खोटे दावे दाखल करण्यापेक्षा कंपनीने लोकांच्या आरोग्य व पर्यावरणाचा विचारा करावा व प्रकल्प योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा किंवा त्याठिकाणी शेतीवर आधारित पर्यावरणमुक्त प्रकल्प सुरू करावा, यासाठी आमचा त्यांना पाठिंबा असेल, असे त्यांनी सांगितले. डॉ. नंदिनी बाभूळकर म्हणाल्या, लोकशाहीतील संविधानाच्या आधारे आपल्या न्याय व हक्कासाठी जनआंदोलन, रास्ता रोको, मोर्चे काढणे हे मूलभूत अधिकार आहेत. हा दावा न्यायालयात चालविण्यास पात्र नाही. कंपनीचे हे दबावतंत्र असून, जनआंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न आहे.डॉ. बाभूळकर, प्रा. एन. एस. पाटील, अ‍ॅड. संतोष मळवीकर, दयानंद देवण, गणेश फाटक, प्रशांत चौगुले, विष्णू गावडे, विश्वनाथ ओऊळकर, पांडुरंग बेनके, विलास पाटील, तानाजी गडकरी, वसंत निट्टूरकर, बसवंत निट्टूरकर व श्रीशैल नागराळ, आदी १४ जणांना या नोटिसा चंदगड न्यायालयामार्फत बजावण्याचे काम सुरू आहे. कंपनीमार्फत आनंद कामोजी यांनी हा दावा दाखल केला असून, अ‍ॅड. ए. पी. देवण काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)