आजरा : जनता गृहतारण संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात १६ लाख ७४ हजार ४२६ रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना १२ टक्के लाभांश दिल्याचे संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी सांगितले. ते संस्थेच्या १९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. सभेत सेवानिवृत्त सभासद, गुणवंत सभासद व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थाध्यक्ष मारुती मोरे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा घेतला. व्यवस्थापक मधुकर खवरे यांनी विषयपत्रिका, नफा विभागणीचे वाचन उपाध्यक्ष गणपतराव अरळगुंडकर, शासकीय लेखापरीक्षणाचे वाचन मारुती मोरे, संचालक मंडळ कर्जयादीचे वाचन प्रा. डॉ. अशोक सादळे यांनी केले.
गवसे हायस्कूलमधून सेवानिवृत्त झालेले शामराव सुतार, उपाध्यक्ष गणपतराव अरळगुंडकर यांची मडिलगे हायस्कूलच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
शिष्यवृत्ती, दहावी, बारावी, पदवी परीक्षेत यश संपादन केलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेकडे ५० कोटी ९२ लाख ६९ हजारांच्या ठेवी असून २८ कोटी ५१ लाख ४९ हजार इतके कर्ज वाटप केले आहे. गडहिंग्लज व कोल्हापूर येथे स्व:मालकीच्या तर गारगोटी व इचलकरंजी येथे भाडोत्री जागेत शाखा सुरू आहेत.
कराडा, सांगली व सातारा येथे नवीन शाखा काढणेसाठी परवानगी मिळाली आहे, असेही अध्यक्ष मोरे यांनी सांगितले. वार्षिक अहवालाचे मुखपृष्ठ चांगले केल्याबद्दल प्रा. डॉ. आनंद बल्लाळ यांचे कौतुक करण्यात आले.
प्रा. डॉ. अशोक बाचूळकर यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. विनायक चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सभेस सर्व संचालक उपस्थित होते. डॉ. अंजनी देशपांडे यांनी आभार मानले.
------------------------
फोटो ओळी : जनता गृहतारण संस्थेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष मारुती मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गणपतराव अरळगुंडकर, अशोक सादळे आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०३०१२०२१-गड-०६