शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सलग सभांअभावी निधीची अडचण

By admin | Updated: March 7, 2016 00:15 IST

असिफ मोकाशी : पन्हाळा नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाचा फटका

पन्हाळा : पन्हाळा नगरपरिषदेच्या सलग चार सर्वसाधारण व विशेष सभा झाल्या नसल्याने शासनाकडून येणारा निधी चालू वर्षी येणार नसल्याने पन्हाळा शहराच्या विकासाची कामे थांबली असल्याचे नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.नगराध्यक्ष जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत असहकार असा पवित्रा घेत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या ११ नगरसेवकांनी ११ नोव्हेंबरची सर्वसाधारण सभा, १६ आॅक्टोबरची विशेष सभा, तसेच २७ आॅक्टोबर आणि २५ फेब्रुवारीला झालेल्या सर्वसाधारण सभांवर बहिष्कार घातला होता. यामुळे पन्हाळा शहर विकासाचे ५० विषय निधीअभावी थांबणार आहेत. २५ फेब्रुवारीला अंदाजपत्रकाची सर्वसाधारण सभा बोलावली होती. नगरपरिषदेच्या स्थापनेपासून प्रथमच स्थायी समिती सभेच्या मंजुरीशिवाय अंदाजपत्रक या सभेत मांडले गेले. केवळ तीन मिनिटांत मागील सभेचे प्रोसिडिंग सरकारी टपाल व अंदाजपत्रक असे मंजूर करून सभा तहकूब ठेवली.जनसुराज्य शक्ती पक्षाच्या ११ नगरसेवकांनी ७१ विषयांची सभा घेण्याबाबत नगराध्यक्षांकडे मागणी केली आहे. जरी हे विषय किंवा तहकूब झालेल्या सभेचे विषय मंजूर झाले तरी शासनाकडे जानेवारी अखेरपर्यंत निधीची मागणी करता येते. त्यामुळे यापुढे जरी सभा झाल्या व विषयही मंजूर झाले तरी निधी नसल्याने मार्च २०१७ पर्यंत कोणतीही कामे करता येणार नाहीत.नगरपरिषदेकडे येणारे प्रवासी कराचे उत्पन्न व घरफाळा यातून कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शन भागविले जातील. यातच आॅक्टोबर महिन्यात नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक होणार असल्याने त्यासाठी निधी राखून ठेवावा लागणार आहे. नगराध्यक्ष असिफ मोकाशी म्हणाले, मागील चार सभांत जे विषय घेतले होते, त्यातीलच फोड करून ७१ विषय घेऊन सभेची मागणी या नगरसेवकांनी केली आहे. शहराचा पाण्याचा विषय, अग्निशामक गाडी घेणे, खराब रस्त्यांचा विषय, सीसीटीव्ही, आदी विषय गंभीरतेने घेतल्याने आमदार सत्यजित पाटील, अमल महाडिक, सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, उल्हास पाटील व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे पन्हाळागडाला निधी द्यावयास तयार आहेत; पण सभाच होत नसल्याने व ते विषय मंजूर होत नसल्याने या सर्वांकडे निधी मागता येत नाही. (प्रतिनिधी)परिणाम : शहरातील रखडणारी कामेमार्च २०१७ अखेर निधीअभावी रखडणारे विषय - शिवस्मारकाचे बांधकाम, नगरोत्थान योजना, पर्यटन विकास योजना, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, अग्निशामक गाडी, पिण्याचा पाण्याचा प्रश्न.सभेचे विषय मंजूर झाले तरी शासनाकडे जानेवारी अखेरपर्यंत निधीची मागणी करता येते. त्यामुळे यापुढे जरी सभा झाल्या व विषयही मंजूर झाले तरी निधी नसल्याने मार्च २०१७ पर्यंत कामे करता येणार नाहीत.