शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या जागेचा प्रश्न खोळंबला

By admin | Updated: May 10, 2017 00:26 IST

शहरातील कचरा प्रश्न गंभीर : जयसिंगपूर पालिकेकडे जागेचे नऊ प्रस्ताव

संदीप बावचे ।  --लोकमत न्यूज नेटवर्क --जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी जागेशिवाय पर्याय नाही. जागा खरेदी करणे आणि त्याठिकाणी कचरा टाकणे हाच प्रश्न पालिकेसमोर असला तरी पालिकेने निविदा काढून प्रस्ताव मागविले होते. यामध्ये तब्बल नऊ जागेचे प्रस्ताव आले आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सभेत जमीन भाडेतत्वावर घेणे अथवा खरेदी करणे हा विषय सभेत तहकूब करण्यात आला होता. त्यामुळे सध्या नवीन जागेचा प्रश्न पुन्हा खोळंबला आहे. १ जानेवारी २०१७ पासून चिपरी हद्दीतील खाणीत कचरा टाकण्यास विरोध झाल्याने गेल्या चार महिन्यांपासून खामकर मळ्यातील जुन्या विहिरीत कचरा टाकला जात होता. पालिका प्रशासनाकडून कचरा टाकण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून कचराकुंड्या हाऊसफुल्ल झाल्यामुळे कचरा प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले होते. कचराकुंड्या भरून वाहत असल्यामुळे दुर्गंधी पसरली होती. कचऱ्याचे साचलेले ढीग त्यावर तुटून पडलेली डुकरे व गाढवे हे चित्र शहरात दिसत होते. दररोज संकलित होणारा सुमारे १६ टन कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न पालिकेसमोर पुन्हा आ वासून उभा राहिला आहे. दरम्यान, खामकर मळ्यातच पुन्हा हा कचरा टाकला जात असला तरी हा तात्पुरताच पर्याय आहे. सांगली महापालिकेच्या कचरा डेपोत कचरा टाकण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. कचऱ्याप्रश्नी प्रशासनच टार्गेट होत आहे. दरम्यान, ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सपाटीकरण जमिनीचा शोध पालिकेकडून घेतला जात आहे. शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जमिनीची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर अशी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी, मिळकतधारकांनी कागदपत्रासह पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन निविदेद्वारे करण्यात आले होते. तब्बल नऊ जमीनमालकांचे प्रस्ताव पालिकेकडे आले आहेत. यातील बहुतांशी जमिनी काळ्या मातीतील असल्यामुळे त्या जमिनी उपयोगाच्या ठरणार नाहीत. उर्वरित जमिनीबाबत सभेत ठराव करणे गरजेचे आहे. सभेत विषय तहकूब२९ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरात संकलित होणारा ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करणे, भूभरावासाठी जमीन भाड्याने घेणे किंवा खरेदी करणे असा विषय होता. चौदाव्या वित्त आयोगातून हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी गरजेची असल्यामुळे हा विषय सभागृहात मंजूर करून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार होता. मात्र, सभेतच हा विषय तहकूब करण्यात आल्यामुळे जागेचा प्रश्न पुन्हा प्रलंबित पडला आहे. ‘ताराराणी’चे शाहू आघाडीला साकडे१ शहरात गंभीर बनलेला कचरा प्रश्न चांगलाच गाजत आहे. त्यामुळे ताराराणी आघाडी व शाहू आघाडीने पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. २ २९ एप्रिलला झालेल्या सभेत ‘ताराराणी’चे पक्षप्रतोद बजरंग खामकर यांनी शाहू आघाडी व उपनगराध्यक्ष संजय पाटील -यड्रावकर यांनी पुढाकार घेतला तर कचऱ्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लागेल, अशी स्पष्टोक्ती दिली होती. ३ कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन्ही आघाड्यांनी समन्वयातून मार्ग काढावा, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.