शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

खासगी तंत्रनिकेतनचे अनुदान थकीत

By admin | Updated: February 11, 2017 00:38 IST

पगार थांबल्याने ५0 हजार शिक्षक, कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

कोल्हापूर : राज्यातील विनाअनुदानित खासगी तंत्रनिकेतनचे सुमारे सव्वा लाख शिक्षक, कर्मचारी वेतन मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत. तंत्रनिकेनला विद्यार्थ्यांसाठीच्या सवलतींचे अनुदान शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने ४ ते १० महिन्यांपासून शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे.सध्या राज्यात विनाअनुदानित तंत्रनिकेतनची संख्या ४२० असून यामध्ये सुमारे ५० हजार शिक्षक, तर ७५ हजार शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. या शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन हे विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या ट्युशन फी (शिक्षण शुल्क) मधून अदा केले जाते. ईबीसी, ओबीसी, अल्पभूधारक, अल्पसंख्याक, आदी विविध शिष्यवृत्ती, सवलतीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ट्युशन फीमधील ५० ते १०० टक्के अनुदान राज्य शासन हे समाजकल्याण, केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक, आदी विभागांकडून प्रत्येक तंत्रनिकेतनला दिले जाते. मात्र, बहुतांश तंत्रनिकेतनला शासनाकडून संबंधित अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे या तंत्रनिकेतनमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. गेल्या ४ ते १० महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालेले नाही. वेतन नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ज्ञानदानाचे काम करूनही वेतन मिळत नसल्याने शिक्षक, कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. (प्रतिनिधी)‘दिले-घेतले’द्वारे अन्यायवेतन थकीत राहण्यामागे अनुदान मिळाले नसल्याचे एक कारण आहेच. मात्र, त्याबरोबर ‘दिले-घेतले’च्या माध्यमातून काही संस्थाचालकांचा भ्रष्टाचारदेखील कारणीभूत असल्याचे टीचर्स असोसिएशन फॉर नॉन-एडेड पॉलिटेक्निक्सचे (टॅफनॅफ) राज्य सचिव प्रा. श्रीधर वैद्य यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘दिले-घेतले’मध्ये शिक्षकांना शासनाच्या नियमानुसार वेतन दिले जात असल्याचे कागदोपत्री दाखविले जाते. मात्र, प्रत्यक्षात वर्षाच्या सुरुवातीला काही संस्थाचालक हे शिक्षक, कर्मचाऱ्यांकडून काही कोरे धनादेश (चेक) घेतात. याद्वारे वेतनातील ठरावीक रक्कम दरमहा घेतात. त्यामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या हातात नियमापेक्षा कमी वेतन पडते. शिवाय त्यासाठी अनेकदा दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागते. गेल्या १४ महिन्यांपासून अनेक तंत्रनिकेतनमध्ये वेतन अदा झालेले नाही. यावर अखेर वैतागून गडचिरोलीतील काही शिक्षक, कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तंत्रनिकेतनचे लेखापरीक्षण केल्यास तेथील वास्तव निश्चितपणे समोर येईल.