शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबू

By admin | Updated: September 28, 2016 00:37 IST

रंकाळा प्रदूषण प्रश्न : हरित लवादाचा इशारा; दोघांचे वेतन रोखण्याचे आदेश

कोल्हापूर : रंकाळा प्रदूषणमुक्त करण्यासाठी दिरंगाई केल्याबद्दल तसेच कोणतेही प्रदूषण रोखण्याची भक्कम उपाययोजना सादर करण्यात कसूर केली त्याबद्दल कोल्हापूर महापालिकेच्या पर्यावरण अभियंता व जलअभियंता या दोघांचे वेतन रोखण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाचे न्या. यू. डी. साळवी व तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिले. पुढील तारखेपर्यंत रंकाळा प्रदूषणमुक्तीचा सर्वसमावेशक असा अहवाल व उपाययोजना सादर न केल्यास अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबण्याचे आदेश दिले जातील, असा कडक इशाराही या आदेशात दिला. सुनील केंबळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. लवादाने पर्यावरण अभियंता आर. के. पाटील व प्रभारी जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिले व पुढील आदेश होऊपर्यंत वेतन देऊ नये असे आयुक्तांना आदेश दिले. तसेच रंकाळा तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका कोणत्या उपाययोजना करणार आहे, याबद्दल सर्वसमावेशक तसेच भक्कम प्रस्ताव सादर करण्याचेही आदेश देत सुनावणी २५ आॅक्टोबरपर्यंत स्थगित केली.महापालिका लावादापासून लपाछपीचा खेळ खेळत आहे. तसेच रंकाळा प्रदूषणमुक्त करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत नसल्याचे कडक ताशेरे लवादाने ओढले. मागील काही दिवसांपासून लवादाने वेळोवेळी आदेश देत रंकाळा तलावाच्या भोवतालच्या वसाहतीतून जे सांडपाणी वाहते, त्याचे नियोजन व प्रक्रिया कशी करणार, यावर वारंवार विचारणा केली. सुनावणीस महापालिकेतर्फे कोण अधिकारी उपस्थित आहे, अशी विचारणा केली असता कोणीच जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर लवादाचा पारा अधिकच चढला. लवादाने महापालिकेची रंकाळा प्रदूषणमुक्त करण्याची इच्छाशक्तीच दिसत नसल्याचे कडक ताशेरे ओढले. त्याचवेळी लवादाने आपले अधिकार वापरून पर्यावरण अभियंता आर. के. पाटील व प्रभारी जल अभियंता सुरेश कुलकर्णा यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिले व पुढील आदेश होईपर्यंत वेतन देऊ नये, असे आयुक्तांना आदेश दिले. तसेच रंकाळा तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका कोणत्या उपाययोजना करणार आहे, याबद्दल सर्वसमावेशक तसेच भक्कम प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत, सुनावणी २५ आॅक्टोबरपर्यंत स्थगित केली. (प्रतिनिधी)उत्सव साजरा करायचाय का?याचिकाकर्ते सुनील केंबळे यांनी, खुद्द आयुक्तांनाच इथे उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती लवादास केली; पण लवादाने त्यांना बोलावून काय उत्सव साजरा करायचा आहे का? असा खोचक प्रश्न करून जबाबदारीची जाणीव करून दिली. महापालिकेस सुनावलेमंगळवारी सुनावणीवेळी महापालिकेतर्फे वकील धैर्यशील सुतार यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला; पण लवादाचे समाधान झाले नाही. त्यावर लवादाने महापालिकेने जबाबदारीने विधाने करावीत, असे सुनावले.