शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंग, वसतिगृहात तूूरडाळ खपवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:35 IST

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यात तूरडाळीचा साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तोंडावर पावसाळा असल्याने डाळ खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य शासनाने कोणत्याही परिस्थितीत डाळीचा साठा संपविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्यातूनच शासनाकडून तुरुंग, वसतिगृहे, शासकीय रुग्णालये व महाविद्यालये, अन्न व औषध प्रशासन, आदी कार्यालयांमध्ये तूरडाळ खपवा, असे ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यात तूरडाळीचा साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तोंडावर पावसाळा असल्याने डाळ खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य शासनाने कोणत्याही परिस्थितीत डाळीचा साठा संपविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्यातूनच शासनाकडून तुरुंग, वसतिगृहे, शासकीय रुग्णालये व महाविद्यालये, अन्न व औषध प्रशासन, आदी कार्यालयांमध्ये तूरडाळ खपवा, असे ‘टार्गेट’च दिले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मागणी नोंदणीची कार्यवाही सुरू केली आहे.राज्य शासनाने शेतकऱ्यांकडून हमीभावाने तूरडाळ खरेदी केली आहे. जवळपास ४५ लाख क्विंटल तूर शिल्लक होती. त्यावर प्रक्रिया करून २५ लाख क्विंटल तूरडाळ तयार करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेला साठा पावसाळ्यापूर्वी संपविण्याच्या विवंचनेत राज्य शासन आहे. त्यामुळे अन्नसुरक्षेतील लाभार्थ्यांना रेशनवर तूरडाळ विक्रीबरोबरच आता तुरुंग, सरकारी वसतिगृहे, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, अंगणवाड्या, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, शासकीय महाविद्यालये, आदी ठिकाणी तूरडाळ खपवा, असे निर्देश पणन व पुरवठा विभागाच्या सचिवांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. जिल्हाधिकाºयांंनी याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाºयांना संबंधितांशी संपर्क साधून मागणी नोंदवून घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नुकतीच जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडून कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल विकास), जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिकारी, अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे अधिकारी व शासकीय महाविद्यालयांचे प्रतिनिधी यांच्याकडून तूरडाळीच्या मागणीबाबत माहिती मागविली आहे. ही तूरडाळ संबंधित विभागांना थेट रेशनवर नसली तरी मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे.एकंदरीत शिल्लक राहिलेली तूरडाळ येनकेन प्रकारे खपविण्यासाठी सरकारकडून जिल्हा प्रशासनाला दिलेल्या उद्दिष्टामुळे चांगलीच धावपळ उडाली आहे. संबंधितांकडून जास्तीत जास्त मागणी नोंदवून घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.रेशन दुकानांमधून उद्यापासून तूरडाळविक्रीकोल्हापूर : जिल्ह्यासाठी मे महिन्यातील २ हजार ९०० क्विंटल तूरडाळ जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून चलनाद्वारे रेशन दुकानदारांकडून तूरडाळीचे पैसे भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.पैसे भरून घेतल्यानंतर दुकानदारांना द्वारपोच योजनेद्वारे आज, मंगळवारी डाळ पोहोच केली जाणार आहे. यानंतर दुकानांमधून उद्या, बुधवारपासून ग्राहकांना तूरडाळ विक्री होणार आहे.जिल्ह्यातील १५७२ रेशन दुकानांमधून साडेपाच लाख अन्न सुरक्षा योजनेतील रेशनकार्डधारकांना या तूरडाळीची विक्री सुरू होणार आहे. ही तूरडाळ रेशनवर ५५ रुपये किलोने कार्डधारकाला विक्री केली जाणार आहे.रेशन दुकानदारांकडून डाळ खरेदीसाठीचे पैसे चलनाद्वारे भरून घेण्याचे काम आज, मंगळवारपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर संबंधित दुकानदारांना द्वारपोच योजनेद्वारे डाळ पोहोच केली जाईल. त्या दृष्टीने जिल्हा पुरवठा विभागाकडून नियोजन सुरू आहे.विक्री ५५ रुपयांनीच होणाररेशनवर ५५ रुपये दराने १ किलो तूरडाळीची विक्री होत आहे. त्याच दराने वसतिगृहे, शासकीय रुग्णालय व महाविद्यालये, अन्न व औषध प्रशासन, आदी कार्यालयांमध्ये तूरडाळीची विक्री होणार आहे.