गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे अशी : रोहन राजेद्र पोवार (वय २६, रा. मंगळवार पेठ), कुलदीप पवार (रा. उमा टॉकीज चौक), अमित पाटील (रा. पाचगाव, ता. करवीर), संदीप कदम (रा. कऱ्हाड), विशाल सुनील जाधव (२६, रा. बिंदू चौक) तसेच ‘फन गेम’ ही ऑनलाईन वेबसाईट तयार करणारे मुंबईतील अज्ञात आरोपी.
शहर व परिसरात काही ठिकाणी ऑनलाईन जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाल्याने शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी त्याबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार जुना राजवाडा पोलिसांनी गोखले कॉलेज चौकातील एका कॉम्प्लेक्समधील दुकानगाळ्यात ‘फन गेम’ नावाचा ऑनलाईन जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकला असता तेथे ऑनलाईनवर तीन पानी जुगार, अंदर बाहर, रोलेट, फन टारगेट व इतर जुगार खेळ फन गेम’च्या साईटवर सुरू असल्याचे आढळले. संशयित लोकांना ऑनलाईन जुगार खेळण्यास भाग पाडून लोकांकडून हार जितचे पैसे गुगल पे, फोन पे अशा स्वरूपात स्वीकारत होते. कमीत कमी लोकांना जुगाराचे पैसे लागतील असे बदल त्या साईटमध्ये करून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. छापा टाकून पोलिसांनी सहाजणांवर गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.