शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर येथील वारणा हॉस्पिटलवर छापा

By admin | Updated: November 4, 2014 01:03 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तपासणी

इस्लामपूर : शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील डॉ. राम कुलकर्णी यांच्या वारणा हॉस्पिटल शाखा क्रमांक दोनवर आज, सोमवारी जिल्हा प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. तेथील गर्भलिंग चाचणी व गर्भपातासंबंधीच्या कागदपत्रांची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तपासणी करण्यात आली. दिवसभराच्या तपासणीनंतर पथकाने काही आक्षेपार्ह कागदपत्रांसह रुग्ण तपासणीचे दप्तर ताब्यात घेतले.आज सकाळी पावणेबाराच्या सुमारास प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान व चिकित्सा समितीच्या सांगली जिल्ह्याच्या कायदे सल्लागार अ‍ॅड. अर्चना उबाळे यांच्यासह तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्या पथकाने छापा टाकला. प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान व चिकित्सा करण्यासह गर्भपात केल्यासंबंधीच्या नोंदींचा अहवाल या कायद्यांतर्गत असणाऱ्या जिल्हास्तरीय समितीकडे जात असतो. वारणा हॉस्पिटलमधील यासंबंधीच्या कामकाजाची छाननी केल्यानंतर शहर व परिसरातील इतर सोनोग्राफी केंद्रांपेक्षा वारणा हॉस्पिटलमध्ये तुलनेने जास्त गर्भलिंग चाचणी व गर्भपात होत असल्याचे निदर्शनास आल्यावर जिल्हास्तरीय समितीचे प्रमुख जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी या हॉस्पिटलच्या दप्तर तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार अ‍ॅड. उबाळे, तहसीलदार सरनोबत यांच्या पथकाने ही तपासणी केली. गेल्या तीन महिन्यांतील सुमारे ५०० रुग्णांच्या तपासणी कागदपत्रांची छाननी करण्याचे काम सुरू होते. दिवसभरात सुमारे शंभरावर केस पेपर या पथकाने तपासले. त्यातील काही आक्षेपार्ह कागदपत्रेही ताब्यात घेतल्याचे अ‍ॅड. उबाळे यांनी सांगितले. याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही अ‍ॅड. उबाळे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. (वार्ताहर)