शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा कारखान्यावर छापा

By admin | Updated: September 16, 2015 01:15 IST

कोंडिग्रेत कारवाई : दहाजणांना अटक; मशिनरीसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

जयसिंगपूर : कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथे गुटखा निर्मिती कारखान्यावर जयसिंगपूर पोलिसांनी छापा टाकून दोन मशिनरीसह ६ लाख १३ हजार २७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी दहाजणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार विलास नागेश जमदाडे (वय ३९, रा. हरिपूर, सांगली), कुमार बापू कचरे (४०, रा. कोंडिग्रे) यांच्यासह गोविंद बाबूराव कुबडगी (३०, रा. हरिपूर), मुकेश नथुराम कडवा (२०), गणेश रामेश्वर भानावत (१९), विष्णू सुरेश भानावत (१९), पूनाराम सोनलाल गोरण (२२), रामनिवास लक्ष्मण गोरण (३२, सर्व रा. राजस्थान), राजसिंग छोटेलाल अनुरागी (२२, रा. उत्तर प्रदेश) व हुसेन कुतबुद्दीन कोतवाल (२४, रा. निमशिरगाव) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कोंडिग्रे येथील मंगलनगरमध्ये पिंटू कोळेकर याच्या घरात गुटखा तयार केला जातो याची पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता, गुटखा मिक्सर व पॅकिंग मशिनरी दिसून आली. याठिकाणी पोलिसांना गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळून आला. दरम्यान, जप्त केलेला मुद्देमाल रात्री टेम्पोमधून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. संशयितांचे मोबाईल व मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या. संशयित हे सराईत असून कर्नाटकातून कच्चा माल आणण्यात आला आहे. महिन्याभरापासून येथे गुटखा कारखाना सुरू होता. (प्रतिनिधी)