शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

प्रधानमंत्री गरीब कल्याणचे पैसे पोस्टामार्फत द्यायला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:53 IST

जिल्ह्यात एकूण ५३५ पोस्ट कार्यालय कार्यरत असून, त्यापैकी ४३९ ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत. या ग्रामीण पोस्ट कार्यालयामधून ६७४ प्रशिक्षित ग्रामीण डाकसेवक रक्कम अदा करण्यासाठी कार्यरत आहेत.

कोल्हापूर : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून आलेले पैसे जनधन खात्यावर जमा झाले आहेत. हे पैसे पोस्ट शाखेमधून तसेच ग्रामीण डाक सेवकाच्या माध्यमातून मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत ९ एप्रिल रोजी आदेश दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.बचत खाते आधार क्रमांकाशी जोडलेली आहे.

अशा खात्यावरील रक्कम बायोमेट्रीक यंत्राद्वारे पोस्ट कार्यालय किंवा ग्रामीण डाक सेवकाच्या माध्यमातून मिळणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता सर्व बँकातील खातेधारक ज्यांच्या खात्याला आधार क्रमांक जोडलेला आहे, असे लाभार्थी पोस्ट कार्यालयामधून पैसे काढू शकतील. या प्रकारचे पैसे काढण्याची मर्र्यादा प्रतिदिन रुपये दहा हजार रुपये असणार आहे.

जिल्ह्यात एकूण ५३५ पोस्ट कार्यालय कार्यरत असून, त्यापैकी ४३९ ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत. या ग्रामीण पोस्ट कार्यालयामधून ६७४ प्रशिक्षित ग्रामीण डाकसेवक रक्कम अदा करण्यासाठी कार्यरत आहेत. आधार क्रमांकाशी जोडलेल्या कुठल्याही बँकेच्या बचत खात्यावरील व्यवहार या ग्रामीण डाक सेवकांकडून करता येणार आहेत. पोस्ट कार्यालयातर्फे या सुविधा, सध्या उपलब्ध असलेल्या बँक शाखा, एटीएम, व्यवसाय समन्वयक, ग्राहक सेवा केंद्र व्यतिरिक्त राहतील.

अफवांवर विश्वास ठेवू नये: जिल्हा अग्रणी बॅँक व्यवस्थापककोणत्याही प्रकारे बँक शाखांमध्ये होणारी गर्दी टाळावी. आपली रक्कम बँक खात्यामध्ये सुरक्षित असून कोणताही लाभ परत जाणार नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हा अग्रणी बॅँक व्यवस्थापक राहुल माने यांनी केले आहे.