शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दाम अन् दम देऊन घेतल्या बांधकाम परवानग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:29 IST

भारत चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : २००५ सालातील महापुरामुळे शहाणपण घेतलेल्या महानगरपालिका प्रशासनाने पूररेषेतील बांधकामांना परवानगी देण्याचे ...

भारत चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : २००५ सालातील महापुरामुळे शहाणपण घेतलेल्या महानगरपालिका प्रशासनाने पूररेषेतील बांधकामांना परवानगी देण्याचे बंद केले. पुढे दोन वर्षे त्यावर चर्चाच झाली नाही. त्यानंतर मात्र मंत्रालयातून दबाव टाकून पूररेषेच्या आतील बांधकामांना परवानगी देण्यास भाग पाडून काही मूठभरांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. पुढच्या काळात बिल्डर, कारभारी नगरसेवक आणि अधिकारी यांची एक भ्रष्ट साखळीच निर्माण झाली. त्यातून गेल्या दहा-बारा वर्षांत निर्बंधित क्षेत्रात आलिशान बंगले, मोठे गृहप्रकल्प उभे राहिले. त्याचा परिणाम या महिन्यातील महापुराच्या पाण्यात अनेक नागरी वस्त्या बुडण्यात आणि अनेकांचे मोठे नुकसान होण्यात झाला.अधिकाऱ्यांवर मंत्रालयातून दबावसन २००७ ते २०१४ पर्यंत पंचगंगा नदीच्या पूररेषेच्या आत बांधकामांना मोठ्या प्रमाणात परवानगी दिली गेली. त्यासाठी प्रसंगी मंत्रालयातून दबाव टाकला गेला. तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्यानंतर त्यांनी काही बिल्डरांना नोटीस देऊन ‘तुमची बांधकाम परवानगी रद्द का करू नये?’ म्हणून नोटिसा बजावल्या. अटींचे उल्लंघन करताना अनेकांकडून १५ ते २० फूट उंचीचे मुरमाचे भराव टाकण्यात आले. म्हणून या नोटिसा बजावल्या. त्यावेळीही अधिकाऱ्यांवर दबाव टाकले गेले. नंतर या नोटिसांना केराची टोपली दाखविण्यात आली.नामंजूर गृहप्रकल्पमंजूर झाले कसे?पंचगंगेच्या पूररेषेतील बांधकामे ही एक-दोन वर्षांतील नाहीत. गेल्या बारा-तेरा वर्षांपासूनची आहेत. आयुक्त बदलले की नियम बदलले गेले. प्रत्येक आयुक्तांंची दिशाभूल करायला हेच मूठभर बिल्डर, कारभारी नगरसेवक पुढे असायचे. खानविलकर पेट्रोल पंपाच्या परिसरातील काही गृहप्रकल्पांना परवानगी नाकारली गेली. मात्र कालांतराने तेच नव्याने मंजूर झाले. यामागचे गुपित उघड आहे. ‘दाम अन् दम’ देऊन प्रकल्पांना मंजुरी मिळविली.८० गृहप्रकल्प, ५०० बंगल्यांचे बांधकामसन २००५च्या महापुरानंतर पूररेषा निश्चित झाल्यापासून आतापर्यंत उत्तरेश्वर ते शिवाजी पूल, खानविलकर पेट्रोल पंप ते महावीर कॉलेज, न्यू पॅलेस परिसर, रमणमळा, शासकीय धान्य गोदाम, कसबा बावडा, लाईन बाजार, कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प ते तावडे हॉटेल या परिसरातील पूररेषेत मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत.त्यामध्ये ७० ते ८० मोठ्या गृहप्रकल्पांचा समावेश असून ५०० ते ५५० बंगल्यांच्या बांधकामांचा समावेश आहे. शिवाय पाच ते सहा मोठ्या रुग्णालयांचाही समावेश आहे. परवानगीशिवाय बांधलेल्या घरांची तर मोजदादच नाही.