शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तूरडाळीचा भाव आला ऐंशी रुपयांवर

By admin | Updated: January 30, 2017 00:38 IST

भाजीपाल्याचे दर स्थिर : साखर, शाबू, खोबऱ्याच्या दरात काही प्रमाणात वाढ

कोल्हापूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत डाळींच्या दरांत घसरण झाली असून, किरकोळ बाजारात तूरडाळ ऐंशी रुपयांपर्यंत खाली आली आहे. साखर, शाबू व खोबऱ्याच्या दरांत वाढ झाली असून, सरकी तेलाच्या दरात मात्र थोडी घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर तुलनात्मकदृष्ट्या स्थिर आहेत. फळबाजारात अपेक्षित तेजी दिसत नाही. यंदा पाऊस चांगला झाल्याने तूर व हरभराचे उत्पादन वाढले आहे. परिणामी डाळींची आवक चांगली असल्याने दर कमी होत आहेत. तीन-चार महिन्यांपूर्वी १४० रुपयांपर्यंत असणारी तूरडाळ किरकोळ बाजारात या आठवड्यात ८० रुपयांवर आली आहे. हरभराडाळही १०० रुपयांवर स्थिर असून मूग व मूगडाळीच्या दरांत फारसा चढउतार दिसत नाही. सरकी तेल किलोमागे दोन रुपयांनी कमी झाले आहे. साखरेचे दर हळूहळू वाढत चालले आहेत. किरकोळ बाजारात साखर सध्या ४२ रुपये किलो आहे. शाबूची आवक काहीशी मंदावल्याने ८० रुपयांचा शाबू ८८ रुपयांवर गेला आहे. नारळाच्या दरात वाढ दिसत आहे. किरकोळ बाजारात १० रुपयांचा नारळ १५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे खोबरे व खोबरेल तेलाच्या दरांत वाढ झाली आहे. फळ मार्केट सध्या शांत दिसत आहे. काश्मीर, सिमला, दिल्लीतून सफरचंदांची आवक कमी झाल्याने पेटीमागे १०० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. संत्री, माल्टा, मोसंबी, डाळिंबांचे दर कायम आहेत. फळांचा राजा आंब्याची अजून महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची आवक सुरू असून, लालभडक स्ट्रॉबेरी ग्राहकांना भुरळ घालत आहे. ओला वाटाण्याची आवक अजूनही कमी नसल्याने घाऊक बाजारात सरासरी १६ रुपये किलोपर्यंत दर राहिला आहे. कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, पोकळ्याचे दर कायम आहेत. हरभऱ्याच्या पेंढीची आवक हळूहळू कमी होत चालली आहे. कैऱ्यांची आवक वाढली!बाजारात अजून आंबा येण्यास जरी विलंब असला तरी कैऱ्या दाखल झाल्या आहेत. रोज बाजार समितीत ५० ते ६० कैऱ्यांची आवक होते. साधारणत: ४० रुपये किलो दर मिळत आहे. गूळ ४८ रुपयांवर यंदा गुळाच्या दराने उच्चांक गाठला आहे. एक नंबर गुळाचा दर ४८९० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. गेले आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे २८० रुपयांची वाढ झाली असून, एक किलो बॉक्सच्या दरातही सरासरी ५० रुपयांची वाढ झाली आहे.