शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:22 IST

कोल्हापूर : परताळा परिसरातून रंकाळा तलावात मिसळणारे दुर्गंधीयुक्त काळेकुट्ट सांडपाणी रोखण्यात शनिवारी महानगरपालिका ड्रेनेज विभागाला यश आले. जेथून हे ...

कोल्हापूर : परताळा परिसरातून रंकाळा तलावात मिसळणारे दुर्गंधीयुक्त काळेकुट्ट सांडपाणी रोखण्यात शनिवारी महानगरपालिका ड्रेनेज विभागाला यश आले. जेथून हे सांडपाणी मिसळत होते, त्या नळ्यात मातीची पोती टाकून सांडपाणी अडविले. शिवाय अन्य मार्गाने वळविण्यात आलेल्या पाण्याच्या प्रवाहातील अडथळेही दूर करण्यात आले.

गुरुवारी रात्रीपासून अचानक परताळ्यातील काळेकुट्ट सांडपाणी रंकाळा तलावात मिसळत होते. ज्या बाजूने सांडपाणी मिसळत होते, तेथे पूर्वी मातीची पोती टाकून बंधारा तयार करून नळ्यातून तलावात जाणारे पाणी रोखले होते. पण गुरुवारी रात्रीनंतर अचानक त्यातून रंकाळा तलावात सांडपाणी मिसळू लागले होते. ही बाब महापालिका आरोग्य विभागाच्या लक्षात येताच तातडीने प्रयत्न करून पुन्हा एकदा नळे मुजवून सांडपाणी रोखले गेले.

पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, ड्रेनेज विभागाचे प्रमुख शिवाजी पाटील यांनी शुक्रवारी दुपारनंतर मातीची पोती आणून टाकण्यास सुरुवात केली होती. शनिवारी दुपारी हे काम पूर्ण झाले. सांडपाणी मिसळणे बंद झाले. त्याचवेळी परताळ्यातील सांडपाणी महात्मा फुले सोसायटीच्या बाजूने साडेचारशे एमएम जाडीची पाईप लाईन टाकण्यात आली असून, चेंबरही बांधले आहेत. हे चेंबर साफ करून सांडपाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर केले.

-फोटो - कोलडेस्कवर परताळा या नावाने मेल करत आहे.

ओळ - कोल्हापुरातील रंकाळा तलावात परताळा परिसरातील सांडपाणी मिसळणे बंद करण्यात आले, शुक्रवारी याच नळ्यातून काळेकुट्ट सांडपाणी तलावात मिसळत होते. शनिवारी ते पूर्णत: बंद करण्यात आले.