शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांध गुंडगिरी रोखावी

By admin | Updated: April 30, 2016 00:43 IST

श्रीपाल सबनीस : मायबोली प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार सोहळा

राधानगरी : जातीच्या नासकेपणातून दहशतवाद जन्माला येतो. धार्मिक, राजकीय, झोपडपट्टीदादा व यांसारख्या अन्य गुंडगिरीपेक्षा धार्मिक गुंडगिरीचा समाजावर विपरीत परिणाम होत आहे. इस्लामचा शांती संदेश समजून न घेता काही विकृती निर्माण होते. तसेच हिंदू धर्माला काळिमा फासणारे काही वाचाळ महाराज निर्माण झाले आहेत. त्यामुळे धर्मांध गुंडगिरी रोखणे हेच सर्व प्रकारच्या लेखकांचे उद्दिष्ट असायला पाहिजे. कोणत्याही भीतीला न डगमगता लेखणीचा वापर करणे आवश्यक आहे, असे परखड मत ज्येष्ठ समीक्षक व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. येथील मायबोली साहित्य प्रतिष्ठानच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. ग्रामीण साहित्यिक कृष्णात खोत अध्यक्षस्थानी होते. यावेळी विविध कार्यक्रम झाले.यावेळी सबनीस म्हणाले, जगभरात फैलावणारा दहशतवाद रोखणे हे सर्व राष्ट्रांपुढील मोठे आव्हान आहे. सर्व देश यासाठी एकत्र येत आहेत. सत्य, अहिंसा व शांततेचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान जगभरात पसरत आहे. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा गांधी विचाराने प्रभावित आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात फिरताना गांधी, बुद्ध व भगवान महावीरांच्या विचारांचा प्रचार करतात. सांस्कृतिक एकतावाद हा नवा राष्ट्रवाद व्हावा. सेक्युलर भारत निर्माण होऊन जातीव्यवस्था संपण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची आवश्यकता आहे.मातीशी इमान राखणाऱ्या ग्रामीण प्रतिभा व परंपरा वंदनीय आहेत. बोलीशी जोडलेली भाषा व खेड्यातील सांस्कृतिक श्रीमंती हेच खरे धन आहे, असे गौरवोद्गार सबनीस यांनी काढले. यावेळी कृष्णात खोत म्हणाले, सर्वच क्षेत्रांत सर्व प्रकारची दहशत वाढली आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याची मुभा नाही, हीसुद्धा एक प्रकारची दहशतच आहे. निसर्गवाद हा जीवनाचा मंत्र झाला, तरच जगणे सुसह्य होईल. यावेळी सुनील माने, किरण गुरव, प्रकाश काणकेकर, चंद्रशेखर कांबळे, संजय पारकर, मधुकर मुसळे, संजय डवर, साताप्पा शेरवाडे, सुचित वंजारे, सुरेश चौरे यांचा सत्कार करण्यात आला. कवी बाळ पोतदार यांच्या ‘येणे वाग्यज्ञे’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गोविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यावेळी जि. प. शिक्षण समितीचे सभापती अभिजित तायशेटे, प्रांताधिकारी मोनिका सिंह, तहसीलदार शिवाजी शिंदे, सरपंच सुनीता गुरव, विलास पाटील उपस्थित होते. प्रा. चंद्रशेखर कांबळे यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)