शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’साठीही आता ‘बटण दाबा’

By admin | Updated: October 26, 2014 00:05 IST

चाचपणी सुरू : निवडणुकीत ‘ईव्हीएम’चा वापर शक्य

प्रवीण देसाई \कोल्हापूरवेळ आणि अचूकता येऊन निवडणूक प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत यंदा ‘ईव्हीएम’ मशीनचा वापर करण्याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या संचालकांना ‘गोकुळ’मध्ये पाठविण्यासाठी मतपत्रिकेवर शिक्का माराव्या लागणाऱ्या मतदाराला आता लोकसभा, विधानसभेप्रमाणे ‘ईव्हीएम’चे बटण दाबावे लागणार आहे.विधानसभा निवडणुकीनंतर आता लोकांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघा (गोकुळ)च्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. ठराव, पॅनल यादृष्टीने काही प्रमाणात तयारी सुरू आहे. संचालक व समर्थक मतदार यांच्याकडून ही तयारी सुुरू असताना राज्य सहकार निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीत ‘ईव्हीएम’ मशीनच्या वापराबाबत चाचपणी सुरू केली आहे. मतपत्रिका (बॅलेट पेपर)मुळे मते बाद होण्याचे मोठे प्रमाण, मतमोजणीसाठी लागणारा प्रचंड वेळ आणि यासाठी लागणारे मनुष्यबळ यांमुळे मतदान व मतमोजणी प्रक्रिया लांबते हे सर्वश्रुत आहे. त्या दृष्टीने पावले उचलत निवडणूक आयोगाने ‘ईव्हीएम’चा वापर सुरू केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत याचे चांगले निकाल मिळाले. कमी वेळात व पारदर्शीपणे या यंत्राद्वारे मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडली; परंतु या मशीनचा वापर सुरू होऊनही सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचा वापर झालेला नाही. येत्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये या मशीनचा वापर करून ही प्रक्रिया सुलभ करण्याचा विचार निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही किंवा तो कधी होणार हे निश्चित झालेले नाही. तरीही आयोगाने त्यादृष्टीने पावले उचलली असल्याचे समजते.