शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा बँक घोटाळाप्रकरणी माजी संचालकांचे म्हणणे सादर

By admin | Updated: June 10, 2015 00:34 IST

तिघांची हजेरी : पुढील सुनावणी १६ जूनरोजी

सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेतील १७० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार चौकशीस गेल्या दीड महिन्यापासून सुरुवात झाली आहे. या प्रकरणात मंगळवारी माजी उपाध्यक्ष नरसगोंडा पाटील, तत्कालीन कार्यकारी संचालक भगवान तावदर, माधव गोगटे यांनी म्हणणे मांडले. अन्य संचालकांनी वकिलांमार्फत म्हणणे सादर केले. पुढील सुनावणी १६ जून रोजी होणार आहे. चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्यासमोर मंगळवारी दिवसभर सुनावणीचे कामकाज चालू होते. याप्रकरणी बॅँक कर्मचाऱ्यांनी लेखी म्हणणे सादर केले आहे. गत सुनावणीवेळी काही कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांच्या मागणीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यांना कागदपत्रे देण्यात आल्यानंतर काहींनी म्हणणे सादर केले. ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. वसंतदादा बँकेचे ११ जानेवारी २००८ रोजी विशेष लेखापरीक्षण झाले होते. या लेखापरीक्षणात १७० कोटी रुपयांच्या अनेक नियमबाह्य कामांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. याच लेखापरीक्षणाआधारे ४ जुलै २००८ रोजी कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी यास स्थगिती दिली होती. विद्यमान सहकारमंत्र्यांनी याप्रकरणी तत्कालीन माजी संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन यावरील स्थगिती उठविली. त्यानुसार चौकशीस सुरुवात झाली आहे. १७० कोटी रुपयांच्या नियमबाह्य कामांमध्ये ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. बहुतांश माजी संचालक व कर्मचाऱ्यांनी लेखापरीक्षण अहवाल व संबंधित कागदपत्रांच्या मागणीचे अर्ज पहिल्या सुनावणीवेळी सादर केले होते. दुसऱ्या सुनावणीवेळीही कागदपत्रांचाच विषय सुरू होता. (प्रतिनिधी)दिग्गजांचा समावेश...माजी मंत्री मदन पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, महापालिकेचे नगरसेवक सुरेश आवटी, माजी नगरसेविका बेबीताई पाटील, माजी नगरसेवक किरण जगदाळे, कुंदन बापूसाहेब पाटील, मुजीर जांभळीकर आदी ३४ माजी संचालकांचा या प्रकरणात समावेश आहे.